मुंबई बातम्या

स्वप्नापुढे वयानेही मानली हार, मुंबईतील या व्यक्तीने ८३ व्या वर्षी खरेदी केली पहिली कार – Maharashtra Times

प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. कुणाला चांगलं घर बांधायचं असतं तर कुणाला एक चांगली आवडती कार खरेदी करायची असते. तर कुणाला देश फिरायचा असतो. परंतु, हे स्वप्न कुणाचं साकार होतं तर कुणाचं होत नाही. कुणाचं लवकर होतं तर कुणाचं थोड्या उशीरानं होतं. मुंबईतील एका तरुणानं पाहिलेलं स्वप्न तरुण पणात झालं नाही त्या तरुणाचं स्वप्न वयाच्या ८३ वर्षात पूर्ण झालं. स्वप्न साकार करायला वयाचे बंधन नसते. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. मुंबईतील एका वृद्ध व्यक्तीने आपले स्वप्न ८३ व्या वर्षात पूर्ण केले आहे. कार खरेदी करण्याचे स्वप्न होते परंतु ते साकार करण्यासाठी ८३ वे वर्ष उजाडावे लागले. या व्यक्तीने ८३ व्या वर्षात आपली पहिली कार खरेदी करून स्वप्न साकार केले आहे. याची संपूर्ण माहिती इंस्टाग्रामवर लोकप्रिय असलेला फोटोब्लॉग अकाउंट “ह्यूमन्स ऑफ बॉम्बे” वर पोस्ट शेअर करून दिली आहे.

​८३ वयात खरेदी केली नवी कार

परंतु, Instagram पोस्ट मध्ये व्यक्तीची ओळख आणि त्यांच्या नावाचा उल्लेख जाणिवपूर्वक टाळला आहे. परंतु त्यांनी या वयात कार खरेदी करण्याचा आपला सुखद अनुभव शेअर केला आहे. हे यासाठी खास आहे, कारण, या वयात लोक कार चालवण्याचे धाडस करीत नाहीत. या पोस्टमध्ये या ८३ वर्षीय व्यक्तीने म्हटले की, मला नेहमीच कारची आवड होती. तरुण पणात एक नवी कार खरेदी करायची होती. परंतु, कुटुंबातील जबाबदारी आणि मुलांच्या गरजेपुढे मी माझ्या स्वप्नांना बाजुला ठेवले. पैसे वाचवण्यासाठी मी नेहमी स्वस्त जुन्या कारसोबत समझोता केला.

​नव्या कारचे स्वप्न झाले साकार

मुले स्थायिक झाल्यानंतर सहा नातलगांसोबत एका मोठ्या कुटुंबाचा आशीर्वाद मिळाला. आपल्या गरजेसाठी दुसऱ्यांच्या जुन्या कारला खरेदी करण्याचा निर्णय घेतला. परंतु मुलांनी सांगितले की, आता एक नवीन कार खरेदी करायला हवी. कारण, ते आता नवीन कार मिळवण्यासाठी योग्य आहे. या चर्चेला काही महिन्यानंतर मुलांनी त्यांच्यासाठी एक ग्रे रंगाची Maruti Suzuki Wagon-R बुक केली. परंतु, मुलांनी डिलीवरीची तारखे संबंधी काहीही माहिती दिली नाही. १६ जानेवारीला आपल्या नातवाच्या २५ व्या वाढदिवसाचे निमित्त साधून मुलांनी त्यांना एका आउटडोर लंचसाठी नेण्यात आले.

​कार पाहून डोळ्यात आनंदाश्रू

परंतु, घरी परत जाण्याऐवजी कुटुंब वृद्ध व्यक्तीला Maruti Suzuki च्या शोरूममध्ये नेण्यात आले. बरोबर त्यांच्या डोळ्या समोर नवी कार दिसली हे पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हे सर्व पाहून ते खूपच भावनिक झाले. डिलिवरी समारंभानंतर त्या वृद्ध व्यक्तीने आपल्या नवीन वेगन आर मधून सर्वांना फिरून आणले. नवीन कारचे मालक झाल्यानंतर आजोबाला खूप आनंद झाला असून रोज कार चालवायला आवडेल, असे त्यांनी सांगितले. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना भेटणार असून लोणावळाची एक ट्रिक पूर्ण करायची असल्याचे त्यांनी सांगितले. त्या ठिकाणी आपल्या मित्रांसोबत वेळ घालवायचा आहे, असेही ते म्हणाले.

​नातू झाला २५ वर्षाचा

त्यांचा नातू आता २५ वर्षाचा झाला आहे. त्यामुळे त्यांना वाटते की, स्वातंत्र्य आणि रोमांचचे आपले छोटे दिवस पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. या पोस्टमध्ये सध्या असलेले हे एकटेच आजोबा नाहीत. ज्यांनी डेली रुटीन ड्राइव्हसाठी Maruti Suzuki Wagon-R ला प्राधान्य दिले आहे. Maruti Suzuki ची कॉम्पॅक्ट टॉलबॉय हॅचबॅक उपबल्ध सर्वात व्यवहारिक कार पैकी एक आहे. ही केबिनमध्ये चांगले स्पेस मॅनेजमेंट, कमी टर्निंग रेडिअस सोबत एक हलके स्टियरिंग व्हील सेटअप आणि सिम्पल एन्ट्री तसेच एग्झिट देते. जे जुन्या ड्रायवरला खूप पसंत पडते.

​Wagon-R दोन इंजिन ऑप्शन मध्ये

wagon-r-

तुमच्या माहितीसाठी Maruti Suzuki Wagon-R दोन इंजिन ऑप्शन मध्ये येते. यात १.० लीटर आणि १.२ लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. ज्यासोबत ५ स्पीड मॅन्यूअल किंवा 5-स्पीड AMT गियरबॉक्सचा ऑप्शन मिळतो. छोट्या इंजिनला बेस स्पेक Lxi ट्रिम मध्ये CNG ऑप्शन सुद्धा मिळतो. या हलक्या अपडेट ने सध्याच्या किंमतीवर कोणताही परिणाम पडण्याची शक्यता नाही. सध्या या कारला ५.१८ लाख रुपये ते ६.५८ लाख रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) या किंमतीत विकले जात आहे.

Source: https://maharashtratimes.com/auto-news/dream-came-true-83-year-old-man-buys-his-first-new-car-know-details/articleshow/89451839.cms