मुंबई बातम्या

मुंबई २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना पुणे पोलिसांकडून बँडद्वारे मानवंदना – Loksatta

पुणे : मुंबई मध्ये २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे पुण्यामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस दलातर्फे बँडच्या माध्यमातून सारसबाग येथे शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, यांच्या सह सर्व अधिकारी, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते […]

मुंबई बातम्या

मुंबई: म्हाडाच्या संक्रमण शिबिरार्थींच्या रखडलेल्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाला अखेर सुरुवात – Loksatta

गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबीरातील रहिवाशांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाला अखेर सुरुवात झाली आहे. मुंबईतील ५६ संक्रमण शिबिरांतील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येणार असून सहकार नगर, चेंबूर येथील संक्रमण शिबिरातील रहिवाशांच्या सर्वेक्षणाने या मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांत सर्वेक्षण पूर्ण करून यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचा निर्णय दुरुस्ती […]

मुंबई बातम्या

26/11 Mumbai Attack : अन् धावणारी मुंबई हादरुन गेली 26/11चा भीषण थरार, कित्येक निष्पाप बळी अन् – ABP Majha

Mumbai Terror Attacks : 26 नोव्हेंबरचा दिवस अनेकांसाठी इतर दिवसांप्रमाणे सामान्य होता. 2008 साली मात्र मुंबईकर आणि संपूर्ण देशासाठी हा काळा दिवस ठरला. 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ल्याला आज 14 वर्षे पूर्ण होत आहेत. 14 वर्षांनंतरही आज 26/11 मुंबई हल्ल्याच्या थरारक, वेदनादायी, कटू आठवणी प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात कायम आहेत. 26/11 मुंबई दहशतवादी […]

मुंबई बातम्या

मुंबई : गोखले पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पाच कंपन्या इच्छुक; ८४ कोटी ७२ लाख रुपये खर्च; आठ महिन्यांचा कालावधी – Loksatta

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या रेल्वेच्या हद्दीतील भागाची पुनर्बांधणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मागवलेल्या निविदांना पाच कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता या पाच कंपन्यांमधून कोणाची निवड होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या कामासाठी अंदाजित ८४ कोटी ७२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. गोखले पूलाची पुनर्बांधणी करताना रेल्वेच्या हद्दीतील बांधकामही महानगरपालिकेतर्फे […]

मुंबई बातम्या

Mumbai News: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त – Zee २४ तास

महत्त्वाचे मुद्दे नक्की काय प्रकार घडला?  कशी झाली कारवाई?  प्रशांत अंकूशराव, झी मीडिया, मुंबई: मुंबई पोलिसांची (Mumbai Police) अवैध ई सिगारेट वर धडक कारवाई 58 लाख 50 हजार रुपयांचे सिगारेट जप्त करण्यात आला आहे. मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटची विक्री व साठा करणाऱ्या इसमावर मुंबई पोलिसांच्या सी.बी. कंट्रोल, आर्थिक गुन्हे विभागाने छापा कारवाईत करत […]

मुंबई बातम्या

मुंबई: सेंच्युरी मिल संक्रमण शिबिरातील गाळ्यांच्या वितरणावरील स्थगिती कायम; इतरत्र कुठे ही जाणार नाही – वरळी बीडीडीवासियांची ठाम भूमिका – Loksatta

वरळी बीडीडी चाळीतील पात्र ३०४ रहिवाशांना सेंच्युरी मिल संक्रमण शिबिरातील गाळ्यांचे वितरण करण्याच्या निर्णयास शासन स्तरावरून देण्यात आलेली स्थगिती आठवड्यानंतरही कायम आहे. राज्य सरकार वा म्हाडाने याबाबत अद्याप कोणतीही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. तसेच स्थगितीही उठविण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या बीडीडीवासियांनी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. ‘आम्ही इतरत्र कुठेही […]

मुंबई बातम्या

मुंबई : बेस्टच्या थांब्यांवरील दुचाकी सेवेचा विस्तार करणार; विजेवर धावणाऱ्या आणखी एक हजार दुचाकी टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होणार – Loksatta

बसमधून उतरणाऱ्या प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी तात्काळ एक पर्यायी वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी बेस्ट उपक्रमाने जून २०२२ पासून मुंबईतील निवडक थांब्यांवर विजवर धावणारी दुचाकी सेवा सुरू केली. सध्या ७०० दुचाकी सेवेत असून लवकरच आणखी एक हजार दुचाकीची त्यात भर पडणार आहे. दोन महिन्यात टप्प्याटप्याने या दुचाकीची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली. […]

मुंबई बातम्या

गोवराचा उद्रेक असा रोखणार; मुंबई महापालिकेचं ठरलंय, ‘ॲक्शन प्लॅन’ तयार , राज्य सरकारच्या सूचनांची प्रतीक्षा – Lokmat

– संतोष आंधळेमुंबई  : गोवरच्या उद्रेकाला आळा घालण्याच्या संदर्भात बुधवारी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला केंद्राने काही सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी ज्या भागांमध्ये विशिष्ट वयोगटासाठी गोवर उद्रेकजन्य परिस्थिती आहे, तेथे नियमित लसीकरण वगळून अतिरिक्त लसीचा डोस द्यावा, हे सुचविले आहे. मात्र गोवर उद्रेकाचा परिसर कोणता हे राज्य सरकारने ठरवायचे असून, त्यांनी त्याचे नियोजन करणे अपेक्षित आहे. […]

मुंबई बातम्या

Mumbai Indians: मुंबई इंडियन्स ‘पलटन’साठी गुड न्यूज! IPL च्या आधी ‘तो’ परत आलाय – News18 लोकमत

मुंबई, 23 नोव्हेंबर: आगामी आयपीएलआधी मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई इंडियन्सनं गेल्या आयपीएल लिलावात तब्बल 8 कोटी रुपयांना खरेदी केलेला हुकमी एक्का यंदाच्या सीझनमध्ये मात्र खेळू शकला नाही. पण पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये मात्र तो खेळणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्या खेळाडूचं नाव आहे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर. आर्चर तब्बल दीड वर्षानंतर […]

मुंबई बातम्या

Mumbai Crime : मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत बीएमसी अधिकारी असल्याचे सांगत जबरी चोरी – News18 लोकमत

विजय वंजारा (मुंबई), 24 नोव्हेंबर : मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील उच्चभ्रू वस्ती असलेल्या लोखंडवाला परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई महापालिकेचा अधिकारी असल्याचे सांगून घरात घुसून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना 11 नोव्हेंबर रोजी घडली होती. दरम्यान त्या व्यक्ती ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अक्षय बाबू धोत्रे […]