मुंबई बातम्या

कॉलगर्ल पुरवण्याचे भासवून फसवणूक: मुंबई पोलिसांकडून अट्टल गुन्हेगार जेरबंद, देशात 326 ऑनलाईन फसवणुकीची प्रक… – दिव्य मराठी

12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

मुंबई क्राईम ब्रँचच्या युनिटने तेलंगना, दिल्ली, झारखंड आणि महाराष्ट्रात ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या अट्टटल गुन्हेगारास अटक केली आहे.

कॉलगर्ल पुरवण्याचे भासवून आरोपीने देशभरात अनेक जणांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अटक आरोपींविरुद्ध देशातील विविध राज्यांत एकूण 39 एफआयआर दाखल आहेत.

पोलिसांकडे दिली कबुली

आरोपीने तब्बल 326 ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे केल्याची कबुली पोलिस तपासात दिली आहे. या 28 वर्षीय आरोपीचा आणखी काही प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्याच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही, अशी माहिती पोलिस सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांनी दिली आहे. घाटकोपर पश्चिम येथील साईपूजा हॉटेलजवळ आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

अशी करायचा फसवणूक

अटक करण्यात आलेल्या आरोपीने एका वेबसाइटवर दोन मोबाईल नंबर पोस्ट केले होते. तो लोकांना कॉलगर्स पुरवण्याचे खोटे आश्वासन द्यायचे. फोनपे, पेटीएम आणि गुगलपेद्वारे कॉलगर्स पुरवण्यासाठी तो आगाऊ पैसे घ्यायचा. पैसे मिळाल्यानंतर तो फोन करणाऱ्यांना कॉलगर्स सप्लाय करायचा नाही. कोणी पैसे परत मागितले तर आरोपी मॉर्फ व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करायची धमकी द्यायचा, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या (ऍन्टॉपहिल) अधिकाऱ्याने दिली.

इतर प्रकारेही फसवणूक केल्याचा संंशय

अटक आरोपीने 326 ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याविरुद्ध तेलंगनामध्ये 35, दिल्लीत एक, झारखंडमध्ये दोन आणि महाराष्ट्रात एक एफआयआर आहे. अन्य काही प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्याच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही.

बातम्या आणखी आहेत…

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMimAFodHRwczovL2RpdnlhbWFyYXRoaS5iaGFza2FyLmNvbS9sb2NhbC9tYWhhcmFzaHRyYS9tdW1iYWkvbmV3cy9mcmF1ZC1ieS1wcmV0ZW5kaW5nLXRvLXByb3ZpZGUtY2FsbGdpcmxzLWFjY3VzZWQtYXJyZXN0ZWQtYnktbXVtYmFpLXBvbGljZS0xMzA4NTE4MjUuaHRtbNIBnAFodHRwczovL2RpdnlhbWFyYXRoaS5iaGFza2FyLmNvbS9hbXAvbG9jYWwvbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpL25ld3MvZnJhdWQtYnktcHJldGVuZGluZy10by1wcm92aWRlLWNhbGxnaXJscy1hY2N1c2VkLWFycmVzdGVkLWJ5LW11bWJhaS1wb2xpY2UtMTMwODUxODI1Lmh0bWw?oc=5