मुंबई बातम्या

Mumbai Crime News : मुंबई पोलिसांकडून 75 लाखाचा गुटखा जप्त; 7 आरोपी अटकेत – Sakal

मुंबई
sakal_logo

By

मुंबई : राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखू सुपारी विक्रीवर बंदी असतानाही मुंबई शहरात गुटखा विक्री सुरू असल्याची ग्वाही पोलिसांच्या कारवाईमुळे मिळते . मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेच्या पथकाकडून नुकतेच मुंबईच्या डोंगरी, नळ बाजार परिसरातील ,2 दुकाने , 4 गोडाउनवर कारवाईत अवैधरीत्या गुटखा विक्रीसंदर्भात कारवाई करण्यात आली.

पोलिसांच्या कारवाईत सुमारे 75 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून 2 दुकान मालक आणि 7 कामगारांना अटक करण्यात आली आहे . मुंबई पोलिसांनी अवैध गुटखा विक्रीवर एकाच आठवड्यात दुसरी मोठी कारवाई केली आहे.

एकाच आठवड्यात दुसरी कारवाई

राज्यात गुटखा विक्रीला बंदी असल्याने थेट पान टपरीवर तर गुटखा विकणे शक्य नाही. मागणी असल्याने गुपचूप विक्री जोरात आहे. कधी किराणा दुकानावर तर कधी छोट्या मोठ्या जनरल स्टोअर्समध्ये गुटखा विक्री केल्याचे प्रकार समोर आलेले आहेत. नुकत्याच झालेल्या एका कारवाईत एका सदनिकेतून गुटखा विक्री होत असल्याचे समोर आले होते.

बोरीवली पोलिसांनी अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या 4 आरोपीना 21 जानेवारीला अटक केली . पोलिसांनी बोरिवली स्थित ठिकाणांवर छापामार कारवाई करत आरोपींना अटक केली मिळालेल्या माहितीनुसार कृपाल कुटीर सोसायटी, बोरिवली पश्चिम या ठिकाणी काही इसमानी परराज्यातुन गुटखा आणून विक्रीच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात साठवून ठेवला होता .

त्याप्रमाणे पोलीस पथकाने माहितीची शहानिशा करून छापा टाकला असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व तत्सम तंबाखूपदार्थांचा साठा व विक्री होत असल्याचे दिसुन आले. पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा केला असता 12.59 लाख किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा पदार्थ मिळाल्याने हस्तगत करुन जप्त केला.तसेच 4 इसमांना अटक करण्यात आली. पोलिसांचा या प्रकरणी पुढील तपास चालू आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMibWh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vbXVtYmFpL211bWJhaS1wb2xpY2UtYWN0aW9uLWd1dGtoYS13b3J0aC03NS1sYWtoLXNlaXplZC03LWFjY3VzZWQtYXJyZXN0ZWQtY3JpbWUtcmpzMDDSAXFodHRwczovL3d3dy5lc2FrYWwuY29tL2FtcC9tdW1iYWkvbXVtYmFpLXBvbGljZS1hY3Rpb24tZ3V0a2hhLXdvcnRoLTc1LWxha2gtc2VpemVkLTctYWNjdXNlZC1hcnJlc3RlZC1jcmltZS1yanMwMA?oc=5