मुंबई बातम्या

हवा प्रदूषणात मुंबई दिल्लीच्या पुढे – Sakal

हवा प्रदूषणात मुंबई दिल्लीच्या पुढे

मुंबई
sakal_logo

By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : गुरुवारी मुंबईतील हवा अत्यंत वाईट होती. प्रदूषणात मुंबई दिल्लीच्या तुलनेत पुढे असल्याचे ‘सफर’च्या आकडेवारीवरून समोर आले आहे. मुंबईतील बहुतांश ठिकाणी आरोग्याबाबत सावधानतेचा इशारे देण्यात आला होता. माझगाव येथे सर्वाधिक प्रदूषणात असल्याचे नोंदवण्यात आले. श्वसन विकारात वाढ होणार असून मास्कचा वापर करावा, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत.
गुरुवारी दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक २६२ इतका होता; तर मुंबईत माझगाव येथे ३७२ एवढा नोंदवण्यात आला. मालाड येथे ३४३ एवढा हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदला गेला असून हवा अतिशय वाईट आहे. श्वसनाच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. चेंबूर येथे हवा गुणवत्ता निर्देशांक ३४२ असूनही हवा अतिशय वाईट आहे. प्रत्येकाला या हवेचा त्रास होणार असल्याचा अंदाज आहे. अंधेरी हवा गुणवत्ता निर्देशांक ३२४ असल्याने येथील प्रत्येकाला कमीअधिक प्रमाणात त्रास जाणवू शकतात. बाहेर फिरणे टाळा, मास्क वापरा, असे आवाहन करण्यात आले आहे. वरळी येथे ३१२ हवा गुणवत्ता निर्देशांक असून आरोग्यासाठी इशारा देण्यात आला आहे. श्वसनाच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. बीकेसी येथे ३०६ हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला. या ठिकाणी अतिशय वाईट असा शेरा हवामान स्थितीला देण्यात आला असून प्रत्येकावर कमी-अधिक प्रमाणात परिणाम जाणवू शकतात. नवी मुंबईत हवा गुणवत्ता निर्देशांक १६९ असल्याने ही हवेची स्थिती स्वीकारार्ह असली तरी संवदेनशील तसेच लहान मुलांना आरोग्य समस्या उद्भवू शकतात, असा इशारा देण्यात आला.

श्ववसन मार्गाच्या संसर्गामध्ये वाढ
यावर बोलताना वोक्हार्ट हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसन्स डायरेक्टर डॉ. बेहराम पार्डीवाला यांनी सांगितले, की गेल्या काही आठवड्यांपासून प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये वरच्या श्वसनमार्गाच्या संसर्गामध्ये वाढ झाली आहे. तसेच गंभीर दमा, ब्राँकायटिसचे रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणजे एअर प्युरिफायर वापरा, मास्क घाला, स्वतःला हायड्रेट ठेवा.

मुलांची फुप्फुसे पूर्णपणे विकसित झालेली नसतात. त्यामुळे हवेच्या प्रदूषणाचा सर्वांत जास्त त्रास मुलांना होतो. सर्व पालकांनी आपल्या मुलांना मास्क वापरण्यास सांगितले पाहिजे.
– डॉ. तेजल शेट्टी, कन्सल्टंट पेडियाट्रिशियन, नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालय

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiXmh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vbXVtYmFpL3RvZGF5cy1sYXRlc3QtbWFyYXRoaS1uZXdzLW11bTIyaDA4MDMwLXR4dC1tdW1iYWktMjAyMjEyMDgwMjU4MzbSAWJodHRwczovL3d3dy5lc2FrYWwuY29tL2FtcC9tdW1iYWkvdG9kYXlzLWxhdGVzdC1tYXJhdGhpLW5ld3MtbXVtMjJoMDgwMzAtdHh0LW11bWJhaS0yMDIyMTIwODAyNTgzNg?oc=5