मुंबई बातम्या

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जनता Traffic मध्ये ‘कैद’; पुणे ते मुंबई प्रवास 8 तासांचा – News18 लोकमत

मुंबई, 14 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनाला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. 13 ऑगस्ट, शनिवारपासूनच राज्यात ठिकाठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यातही मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक या महामार्गावर काही किलोमीटर प्रवास करण्यासाठीही नागरिकांना तासन् तास वाट पाहावी लागत आहे.

सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर इतकी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे की, लांबच्या लांब रांगा पाहायला मिळत आहे. नागरिक या वाहतुकीच्या खोळंब्यामुळे सोशल मीडियावरुन आपला राग व्यक्त करीत आहेत. इतकच काय तर पुण्याहून मुंबईला यायला तब्बल 7 ते 8 तास लागत असल्याचंही समोर आलं आहे.

Video : मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; 5 ते 6 किमी लांब रांगाच रांगा

त्यातही कल्याणमार्गे बदलापूर, अंबरनाथ येथे येणाऱ्यांना शिळफाट्याजवळ नेहमीप्रमाणे अनेक तास वाट पाहावी लागत आहे.

याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आले आहे. फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्यांचा अधिकतर वेळ हा वाहतूक कोंडीमध्येच जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

केवळ पुणे ते मुंबईच नाही तर नाशिकहून मुंबईला येतानादेखील हेच चित्र होतं. राखीपौर्णिमेपासून ही वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. मुंबई – नाशिक महामार्गावरील माणकोली ते माजिवाडा दरम्यान मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. राखीपौर्णिमा असल्याने  रक्षाबंधनासाठी जाणारे भाऊ या वाहतूक कोंडीत अडकले होते.

तुमच्या शहरातून (पुणे)

पुणे

  • Engineer उमेदवारांनो, नोकरीची ही संधी सोडू नका; पुण्यातील विद्यापीठात Vacancy; थेट होणार मुलाखत

  • पत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगे; स्वत: कोपऱ्यात उभं राहून...,पुण्यातील किळसवाणा प्रकार!

    पत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगे; स्वत: कोपऱ्यात उभं राहून…,पुण्यातील किळसवाणा प्रकार!

  • Love Marriage : प्रेमविवाहानंतर वैचारिक मतभेद, पुण्यातील दाम्पत्याला नऊ दिवसात घटस्फोट मंजूर

    Love Marriage : प्रेमविवाहानंतर वैचारिक मतभेद, पुण्यातील दाम्पत्याला नऊ दिवसात घटस्फोट मंजूर

  • भाजप-राष्ट्रवादी राड्यानंतर आज दोन्ही पक्ष उतरले रस्त्यावर, पुण्यात नेमकं घडतंय तरी काय?

    भाजप-राष्ट्रवादी राड्यानंतर आज दोन्ही पक्ष उतरले रस्त्यावर, पुण्यात नेमकं घडतंय तरी काय?

  • Shocking VIDEO: रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक, बारामतीतील घटनेचा CCTV आला समोर

    Shocking VIDEO: रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक, बारामतीतील घटनेचा CCTV आला समोर

  • Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यात 50 हजार रुपयांची पुस्तक खरेदी, 200 हून अधिक पुस्तके खरेदी, पाहा VIDEO

    Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यात 50 हजार रुपयांची पुस्तक खरेदी, 200 हून अधिक पुस्तके खरेदी, पाहा VIDEO

  • पुण्यात तृतीयपंथीयांचं ही निघणार Aadhaar Card, खास शिबिराचं आयोजन

    पुण्यात तृतीयपंथीयांचं ही निघणार Aadhaar Card, खास शिबिराचं आयोजन

  • हा अनुभव जीवन बदलवून टाकणारा, रिक्षाचालकाच्या घरी बिर्याणी खाल्ल्यावर अमेरिकन महिलेची पोस्ट व्हायरल

    हा अनुभव जीवन बदलवून टाकणारा, रिक्षाचालकाच्या घरी बिर्याणी खाल्ल्यावर अमेरिकन महिलेची पोस्ट व्हायरल

  • राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट, मनसे उद्या करणार महत्त्वाची घोषणा

    राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट, मनसे उद्या करणार महत्त्वाची घोषणा

  • BREAKING : पुण्यात तुर्तास राजगर्जना नाहीच! राज ठाकरेंची सभा रद्द

    BREAKING : पुण्यात तुर्तास राजगर्जना नाहीच! राज ठाकरेंची सभा रद्द

  • जगू द्याल का नाही? राज ठाकरे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीवरच भडकले

    जगू द्याल का नाही? राज ठाकरे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीवरच भडकले

पुणे

Published by:Meenal Gangurde

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/maharashtra/pune/traffic-on-eve-of-independence-day-pune-to-mumbai-travel-time-is-8-hours-mhmg-746439.html