मुंबई बातम्या

मुंबई इंडियन्ससाठी गूड न्यूज; हे एकच समीकरण त्यांना बाद फेरीपर्यंत पोहोचवणार, पाहा काय करावं लागेल – Maharashtra Times

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या संघाला आतापर्यंत चारही सामन्यांमध्ये पराभव पत्करावे लागले आहेत. गुणतालिकेत मुंबईचा संघ १०व्या स्थानावर आहे. पण तरीही मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलचे जेतेपद कसे जिंकू शकतो, याचे समीकरण आता समोर आले आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ कसे आयपीएल जिंकू शकतो, पाहा…
मुंबई इंडियन्सच्या संघाने अजून पर्यंत एकही गुण पटकावलेला नाही. पण तरीही चारही सामन्यांतील पराभवानंतर ते आयपीएलचा चषक जिंकू शकताात आणि याचे कारणही आता समोर आले आहे. कारण यावर्षी आयपीएमध्ये १० संघ झाले आहेत, त्यामुळे प्रत्येक संघाला आचा १४ सामने खेळायचे आहे, ज्यापैकी मुंबईचे १० सामने अजूनही बाकी आहेत. त्याचबरोबर मुंबईचा संघ या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स, लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्याबरोबर दोनदा भिडणार आहे. त्याचबरोबर गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सबरोबरही त्यांचे दोन सामने होणार आहेत. बाकीच्या चार संघांविरुद्ध त्यांचे प्रत्येकी एक सामने होणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या संघाने आता १० पैकी आठ सामने जरी जिंकले तरी त्यांना बाद फेरीत प्रवेश करता येऊ शकतो. त्याचबरोबर २०१५ साली मुंबईच्या संघावर सलग चार सामने गमावण्याची अशीच नामुष्की ओढवली होती. पण त्याच वर्षी मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातल्याचे सर्वांनीच पाहिले होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही आयपीएलचे जेतेपद जिंकू शकतो, असे समोर येत आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या संघाने २०१४ साली आयपीएलमध्ये सलग पाच सामने गमावले होते. पण त्यानंतरही मुंबई इंडियन्सचा संघ हा प्ले ऑफमध्ये पोहोचला होता. त्यामुळे आतापर्यंत मुंबई इंडियन्सच्या संघाची सुरुवात ही निराशाजनक होत असली तरी अखेरच्या सामन्यांमध्ये ते दमदार कामगिरी करून बाद फेरीत पोहोचतात आणि आयपीएलचा चषकही जिंकू शकतात, असे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना घाबरून जाण्याचे काही कारण नाही. कारण यावर्षीही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून २०१४ किंवा २०१५ सारखी कामगिरी पाहायला मिळू शकते.

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt22/news/mumbai-indians-lost-4-matches-but-they-still-in-the-race-of-ipl-play-off-know-the-calculations/articleshow/90822820.cms