मुंबई बातम्या

मुंबई बजेट २०२२-२३ : मुंबई ‘बेस्ट’ तरणार कशी? – MahaMTB

मुंबई पालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्प २०२२-२०२३मध्ये “बेस्ट”साठी ८०० कोटींची तरतूद

    दिनांक  03-Feb-2022 20:27:17

|

BEST 1

मुंबई : गुरुवारी मुंबई महापालिकेने अर्थसंकल्प २०२२ – २०२३ सादर केला. यामध्ये ‘बेस्ट’साठी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात फक्त ८०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एकीकडे ‘बेस्ट’वर हजारो कोटींचा बोजा असताना महाविकास आघाडी काळात अर्थसंकल्पात केलेल्या निधींच्या तरतुदींमुळे ‘बेस्ट’ तरणार तरी कशी? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

गेल्या वर्षी, म्हणजे मुंबई अर्थसंकल्प २०२१-२२मध्ये ‘बेस्ट’साठी फक्त ७५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. तर अर्थसंकल्प २०२०-२०२१मध्ये ‘बेस्ट’साठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली होती. ओला, उबेर, झूम कार आणि आता रॅपिडोसारख्या खासगी कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या सेवांमुळे ‘बेस्ट’च्या प्रवाश्यांमध्ये घट होत आहे. तसेच, कोरोना महामारी तर अनेक लॉकडाऊनमुळे झालेल्या ‘वर्क फ्रॉम होम’चा परिणामदेखील ‘बेस्ट’ सेवेत झाला आहे. तर या अर्थसंकल्पात ‘बेस्ट’च्या पदरात निराशाच पडली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

Source: https://www.mahamtb.com/Encyc/2022/2/3/Mumbai-Budget-2022-23-BEST-gets-Rs-800-crore-in-BMC-Budget.html