मुंबई बातम्या

Mumbai Weather Forecast: मुंबईकरांना दिलासा, आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाची शक्यता – Times Now Marathi

मुंबईकरांना दिलासा, आठवड्याच्या विश्रांतीनंतर पाऊसाची शक्यता&  | & फोटो सौजन्य:&nbspTimes Now

थोडं पण कामाचं

  • एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर आणि गरम तसेच दमट वातावरणानंतर मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी हवामान खात्याने दिली आहे.
  • या आठवड्याच्या शेवटी मुंबई आणि परिसरात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
  • हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघऱ या भागांसाठी शुक्रवार आणि शनिवारसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. 

मुंबई :  एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर आणि गरम तसेच दमट वातावरणानंतर मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी हवामान खात्याने दिली आहे.  या आठवड्याच्या शेवटी मुंबई आणि परिसरात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.  हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघऱ या भागांसाठी शुक्रवार आणि शनिवारसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. 

शुक्रवारी  वीजेच्या कडकडाटासह जोरादार वाऱ्यांनी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच शनिवारीही काही ठराविक भागात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. शनिवारी रायगड जिल्ह्यात ऑरेंज अर्लट जारी केला आहे. त्यामुळे मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

अरब सागरात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे केरळकडील पाऊस हाउ उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे केरळपासून महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

पुढील दोन दिवसात मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात पावसाची शक्यता असल्याचे आयएमडी मुंबईचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर (K. S. Hosalikar)   यांनी सांगितले. 

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/mumbai-weather-forecast-imd-predicts-heavy-rainfalls-from-12-and-16-september/312230