मुंबई बातम्या

मुंबई: वरळी लिफ्ट दुर्घटना प्रकरणी मोठी कारवाई; दोघांना अटक – Sakal

वरळी: राज्यभरात दरडी कोसळल्यामुळे दुर्घटना घडत असताना वरळी भागात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत लिफ्ट कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 35 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाली असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. वरळी अंबिका बिल्डर्स (शंकरराव पदपथ मार्ग 118 आणि 119 बीडीडी चाळ, हनुमान गल्ली) येथे ही घटना घडली. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याची अक्षम्य चूक केल्याबद्दल कंत्राटदार आणि सुपरव्हायसर या दोघांना मुंबईतील ना म जोशी पोलिस ठाण्यातील पोलिसांनी अटक केली. (Mumbai Worli lift collapse at under construction building contractor supervisor two arrested vjb 91)

हेही वाचा: बापरे! सायन रुग्णालयातून मनोरुग्णाची उडी, सुदैवाने वाचले प्राण

निर्माणाधीन इमारतीत संध्याकाळच्या सुमारास बांधकामासाठी वापरण्यात येणारी लिफ्ट कोसळली. या दुर्घटनेत सुरुवातील चार तर नंतर एक असा पाच जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर जखमींना तातडीने केईएम हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत पार्किंगचे बांधकाम सुरू होते. याच दरम्यान लिफ्ट कोसळली. यात दुर्घटनेत सापडून पाच जणांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: भाभा रुग्णालयातून पाच वर्षाचा मुलगा बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल

अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. बीडीडी चाळ परिसर हा दाटीवाटीचा आहे. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यातच महत्त्वाची बाब म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी न घेतल्याचा ठपका ठेवत बांधकाम कंत्राटदार आणि मुकादम यांना अटक करण्यात आली आहे.

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-worli-lift-collapse-at-under-construction-building-contractor-supervisor-two-arrested-vjb-91