मुंबई बातम्या

मुंबईत आज १४१३ रुग्ण वाढले, तर ४० रुग्णांचा मृत्यू – Zee २४ तास

मुंबई : राज्यात कोरोनाचा सर्वाधिक कहर मुंबईत पाहायला मिळतो आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून येत आहेत. मुंबईत वाढत जाणारी रुग्णांची संख्या ही चिंतेचा विषय बनली आहे. मुंबईत आज कोरोनाचे १४१३ रुग्ण वाढले असून आज एकाच दिवसात ४० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४० हजार ८७७ वर पोहोचली आहे. देशात मुंबई कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनली आहे.

राज्यात आज कोरोनाचे २३६१ नवे रूग्ण वाढले आहेत त्यापैकी १४१३ रुग्ण हे फक्त मुंबईतील आहेत. महाराष्ट्रात एकूण रूग्णसंख्या ७०,०१३ वर पोहोचली आहे. त्यापैकी ४० हजार ८७७ रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. राज्यात आज ७६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ४० रुग्ण हे मुंबईतील आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंता अजूनही कमी होतांनाची चिन्ह दिसत नाहीत.

सध्या राज्यात ५,६७,५५२ लोकं होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. तर ३६,१८९ लोकं संस्थात्मक कोरंटाईन करण्यात आले आहेत.

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/1413-corona-patient-increase-in-mumbai/522353