मुंबई बातम्या

कंगनाचं ऑफिस तोडण्याच्या कारवाईबाबत २७ नोव्हेंबरला निर्णय देणार कोर्ट – Loksatta

कंगनाच्या ऑफिसवर जी तोडक कारवाई करण्यात आली त्याबाबत २७ नोव्हेंबरला हायकोर्ट निर्णय देणार आहे. कंगनाने मुंबई आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं ट्विट केलं होतं. त्यानंतर शिवसेना आणि तिच्या विरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यातही ट्विटर वॉर रंगलं. १० सप्टेंबरला मुंबईत येऊन दाखवणारच असं आव्हान कंगनाने दिलं होतं. ती जेव्हा मुंबईत आली तेव्हा तिच्या ऑफिसचा अनधिकृत भाग मुंबई महापालिकेने पाडला. ही कारवाई आकसातून करण्यात आल्याचा आरोप करत कंगनाने कोर्टाचा दरवाजा ठोठावला. आता कोर्ट या प्रकरणी २७ नोव्हेंबरला निर्णय देणार आहे.

मुंबई महापालिकेने १० सप्टेंबरला बेकायदेशीर बांधकामाचं कारण देत अभिनेत्री कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. यानंतर ही कारवाई थांबवण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. दरम्यान कंगनाने अनेक घोटाळे केल्याचा आरोपही महापालिकेने केला होता. या संपूर्ण वादात कंगना आणि शिवसेना यांच्यातही आरोप आणि प्रत्यारोप झाले. दरम्यान कंगना रणौतने मंगळवारी मुंबई महापालिकेला नोटीस बजावत आपल्या कार्यालयात झालेल्या तोडफोडीच्या नुकसानीची भरपाई म्हणून २ कोटींचीही मागणी केली होती. यावर बीएमसीने उत्तर देत कंगनाने बेकायदेशीरित्या कार्यालय उभारल्याचं म्हटलं होतं.

अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई पोलिसांनी १८ नोव्हेंबर रोजी तिसऱ्यांदा समन्स बजावला होता. कंगनासह तिची बहिण रंगोली चंदेल हिलाही मुंबई पोलिसांनी समन्स बजावला होता. त्यामुळे या दोघींनाही वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहावे लागणार होते. २३ नोव्हेंबरला कंगनाला, तर २४ नोव्हेंबरला रंगोलीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आज म्हणजेच २३ नोव्हेंबरला कंगना हजर राहिली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on November 23, 2020 8:40 pm

Web Title: actor kangana ranaut property demolition matter bombay high court to deliver its judgement on november 27 scj 81

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/actor-kangana-ranaut-property-demolition-matter-bombay-high-court-to-deliver-its-judgement-on-november-27-scj-81-2335744/