मुंबई बातम्या

ठाकरे सरकारचं ‘मुंबई मॉडेल’ खोटं, इथल्या रुग्णांची नोंद पुण्यात; नितेश राणेंचा गंभीर आरोप – TV9 Marathi

त्यामुळे इतर शहरांतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा हा मुंबईच्या तुलनेत जास्त राहतो, असे नितेश राणे यांनी सांगितले. | Nitesh Rane Mumbai Model

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नितेश राणे

मुंबई: देशभरात नावाजला जात असणारा ठाकरे सरकराचा मुंबई पॅटर्न (Mumbai Pattern) हा निव्वळ खोटारडेपणा असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. ठाकरे सरकार मुंबईतील रुग्णांची नोंद पुण्याच्या खात्यात करून येथील आकडा कमी भासवत असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. (BJP leader Nitesh Rane slams Thackeray govt over fake Mumbai Model of Coronavirus control)

नितेश राणे यांनी मंगळवारी ट्विट करुन यासंदर्भात सविस्तर भाष्य केले. मुंबईतील कोरोना रुग्णांची नोंद पुणे आणि इतर शहरांच्या खात्यात करणे, हाच ‘मुंबई पॅटर्न’ आहे का? अनेक लोकांनी मला याबद्दल माहिती दिली आहे. मुंबईत एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाली की त्याला पुण्याच्या कोविड वॉर रुममधून फोन येतो. अशाप्रकारे ठाकरे सरकार मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी भासवत असल्याचे नितेश यांनी म्हटले.

केंद्राने मुबलक साठा पाठवलाय, ठाकरे सरकार लसींचा जाणुनबुजून तुटवडा निर्माण करतंय, दरेकरांचा गंभीर आरोप

कोरोना रुग्ण मुंबईतून पुण्यात ट्रान्सफर केले जातात म्हणजे त्यांना प्रत्यक्षात एका शहरातून दुसऱ्या शहरात हलवले जात नाही. केवळ त्यांची नोंद इतर शहरांच्या कोरोना आकडेवारीत केली जाते. त्यामुळे इतर शहरांतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा हा मुंबईच्या तुलनेत जास्त राहतो, असे नितेश राणे यांनी सांगितले. आता नितेश राणे यांच्या आरोपाला शिवसेना आणि महाविकासआघाडीचे इतर नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.

संबंधित बातम्या:

काय आहे ‘मुंबई मॉडेल’, जे सुप्रीम कोर्टानं केंद्राला दिल्लीसाठी राबवायला सांगितलं!

“रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश, अशी दुटप्पी भूमिका का?”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘कोविडॉलॉजिस्ट’, त्यांचे हात मजबूत करणे प्रत्येकाचे कर्तव्य, शिवसेनेकडून स्तुती

(BJP leader Nitesh Rane slams Thackeray govt over fake Mumbai Model of Coronavirus control)

Source: https://www.tv9marathi.com/politics/bjp-leader-nitesh-rane-says-thackeray-govt-mumbai-model-is-fake-they-transferring-patients-to-pune-454480.html