मुंबई बातम्या

Mumbai Building Collapse: मुंबईत इमारतीचा भाग कोसळला – Times Now Marathi

डोंगरीत इमारतीचा भाग कोसळला&  | & फोटो सौजन्य:&nbspANI

थोडं पण कामाचं

  • मुंबईतील डोंगरी परिसरात इमारतीचा भाग कोसळला 
  • डोंगरी परिसरातील सात मजली इमारतीचा भाग अचानक कोसळला

मुंबई : बुधवारी सकाळच्या सुमारास मुंबईतील डोंगरी परिसरात असलेल्या एका इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. या घटनेनंतर घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले. बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले असून आतापर्यंत ढिगाऱ्याखालून सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील डोंगरी परिसरात असलेल्या एसटी बिल्डिंग चौक परिसरात असलेल्या इमारतीचा भाग कोसळला. बुधवारी सकाळच्या सुमारास इमारतीच्या तिसऱ्या ते सातव्या मजल्याचा काही भाग अचानक कोसळला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून बचावकार्य सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सहा जणांना बाहेर काढण्यात आले आहे. अद्यापही अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. तसेच ही इमारत नेमकी कशामुळे कोसळली तसेच किती वर्षे जुनी होती याची माहिती अद्याप कळू शकलेली नाहीये.

इमारत दुर्घटना सुरूच

काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील काजळपूरा भागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून दूर्घटना घडली होती. सोमवारी (२५ ऑगस्ट २०२०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या घटनेनंतर या इमारतीचा बिल्डर तसेच अन्य संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.

तर काही दिवसांपूर्वी मुंबईतील फोर्ट परिसरात असलेल्या भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या इमारत दुर्घटनेत काही नागरिकांनी आपले प्राण गमावले होते. फोर्ट भागातील सहा मजली भानुशाली बिल्डिंगचा उत्तरेकडील भाग कोसळून त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले होते. इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख व जखमींना ५० हजार रुपयांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली होती.

यापूर्वी ऑगस्ट महिन्यातच मुंबईतील नागपाडा परिसरातील शुक्लाजी रोडवरील अब्दुल रहमान इमारतीचा काही भाग कोसळून दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत एकुण २ जण जखमी झाले असून एका ७० वर्षांच्या वृद्धेसह १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालेला. 

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/mumbai-parts-of-a-multi-storeyed-building-collapsed-at-st-building-chowk-near-ratnadeep-bar-in-dongri-area/310826