मुंबई बातम्या

मुंबई : वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे अल्पवयीन मोलकरणीला अभिनेत्रीची मारहाण; पोलिसांनी केली अटक – Loksatta

याआधीही अभिनेत्रीने तिच्यावर अत्याचार केला होता आणि नंतर तिचे कपडे काढले होते असा आरोप मुलीने केला

मुंबई पोलिसांनी एका २५ वर्षीय अभिनेत्रीला अटक केली आहे. अभिनेत्रीवर अल्पवयीन मोलकरणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने अल्पवयीन मुलीला सँडलने मारहाण केली आहे. त्याचवेळी, मोलकरणीला काम करण्यास उशीर झाल्याने अभिनेत्रीने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी अभिनेत्रीला अटक करण्यात आली असून चौकशी सुरू आहे.

वर्सोवा पोलिसांनी या अभिनेत्रीला तिच्या मोलकरणीला वेळेवर काम पूर्ण न केल्यामुळे मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटक केली. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वर्सोवा येथील रहिवासी असून ती एका फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. वृत्तानुसार, पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिने नीट काम करत नसल्याचा दावा केल्यानंतर तिच्यावर अनेक वेळा मारहाण केली होती.

“कामात दिरंगाई केल्याबद्दल एका अल्पवयीन गृहिणीवर हल्ला केल्याबद्दल वर्सोवा पोलिसांनी एका २५ वर्षीय अभिनेत्रीला अटक केली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी तिला सँडलने मारहाण केली,” अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

ई टाईमच्या वृत्तानुसार, पीडितेने कथितपणे पोलिसांना सांगितले की, तिने तिचे काम योग्य रीतीने केले नाही म्हणून आरोपीने यापूर्वी तिच्यावर हल्ला केला आणि छळ केला. या वेळी, मुलीने तक्रार दाखल केली कारण अभिनेत्रीने कथितपणे तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिचे कपडे काढले, तिने फोटो आणि व्हिडिओ काढले होते. मारहाणीनंतर तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचे पीडितेने सांगितले आहे, त्यानंतर ती उपचारासाठी रुग्णालयात गेली होती.

दरम्यान, पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३२६, ३५४ (ब) आणि ५०४ तसेच आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्यानुसार एफआयआर नोंदवला आहे. मुलीने बहिणीसोबत पोलीस स्थानकात जाऊन तक्रार नोंदवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Source: https://www.loksatta.com/mumbai/mumbai-actress-arrested-for-thrashing-minor-maid-with-sandals-abn-97-2716929/