मुंबई बातम्या

मुंबई : तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा करोनाने मृत्यू – Loksatta

देशात दिवसेंदिवस करोना व्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय. आता मुंबईतील एका तज्ज्ञ डॉक्टरांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबईतील जीएसएमसी हॉस्पिटलचे शल्यचिकित्सक आणि तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा करोनाने मृत्यू झालाय. डॉक्टर चित्तरंजन भावे हे कान-नाक-घसा तज्ज्ञ होते. एका करोनाग्रस्त रुग्णावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना करोनाची लागण झाली होती, अशी माहिती आहे.

मुंबईतील रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान भावे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. रहेजा हॉस्पिटलमध्येच त्यांनी एका करोनाग्रस्त रुग्णावर शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर करोनाची लागण झाल्याचं लक्षात येताच ते स्वतः गाडी चालवत रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती झाले होते. त्यांना करोना झाल्यामुळे त्यांची पत्नी आणि मुलीला क्वारंटाईन व्हावं लागलं. चित्तरंजन यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर, डॉक्टर चित्तरंजन यांच्या मृत्यूने मुंबईतील डॉक्टरांनी शोक व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on June 2, 2020 2:59 pm

Web Title: doctor chittaranjan bhave dies of covid 19 in mumbai sas 89

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/doctor-chittaranjan-bhave-dies-of-covid-19-in-mumbai-sas-89-2176921/