मुंबई बातम्या

Mumbai Police: ‘चंद्रावर अडकलेल्या व्यक्ती’ने मुंबई पोलिसांकडे मागितली मदत अन् मग… – Zee २४ तास

Mumbai Polices Response To Man Stuck On Moon: मुंबई पोलीस (Mumbai Polices) नेहमीच त्यांच्या रंजक सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. जनजागृतीसाठी अगदी मिम्सपासून ते भन्नाट रिप्लायपर्यंतच्या गोष्टी मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन केल्या जातात. मुंबई पोलिसांच्या या भन्नाट पोस्ट आणि रिप्लाय नेटकऱ्यांना फारच आवडतात. अनेकदा या पोस्ट व्हायरल झाल्याचं दिसत. नुकतीच मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन एक हेल्पलाइन क्रमांक शेअर केला. या ट्वीटवर एका युझरने मजेदार फोटो पोस्ट करत मुंबई पोलिसांची मदत मागितली. यावर मुंबई पोलिसांनीही अगदी जशास तसं उत्तर दिल्याचं पहायला मिळालं.

मुंबई पोलिसांनी सोमवारी आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन एक पोस्ट केली होती. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी, “जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही एखाद्या गंभीर परिस्थितीत अडकलात तर वाट पाहू नका फक्त 100 क्रमांकावर फोन करा,” असं म्हटलं होतं. 

मुंबई पोलिसांच्या या ट्वीटवर एका व्यक्तीने चंद्रावर स्पेससूट घालून पृथ्वीकडे पाहत उभ्या असलेल्या व्यक्तीचा फोटो ट्वीट केला होता. हा फोटो पोस्ट करताना या व्यक्तीने आपण अंतराळामध्ये अडकलो आहोत असं म्हटलं होतं. या मजेशीर ट्वीटला मुंबई पोलिसांनीही रिप्लाय दिला आहे.

“हे आमच्या अधिकार क्षेत्राअंतर्गत येत नाही. मात्र आम्हाला हे पाहून बरं वाटलं की अगदी चंद्रावर अडकल्यानंतरही तुमचा आमच्यावर विश्वास आहे. अगदी मून अॅण्ड बॅक म्हणतात तसा,” असा रिप्लाय मुंबई पोलिसांनी दिला. इंग्रजीमध्ये मून अॅण्ड बॅक हे शब्द खूप सारं या अर्थाने वापरतात.

मुंबई पोलिसांनी केलेला शब्दांचा वापर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला असून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. हे ट्वीट व्हायरल झालं आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMidmh0dHBzOi8vemVlbmV3cy5pbmRpYS5jb20vbWFyYXRoaS9tdW1iYWkvbXVtYmFpLXBvbGljZXMtcmVzcG9uc2UtdG8tbWFuLXN0dWNrLW9uLW1vb24tbGVhdmVzLWludGVybmV0LWNodWNrbGluZy82ODc4NDfSAXpodHRwczovL3plZW5ld3MuaW5kaWEuY29tL21hcmF0aGkvbXVtYmFpL211bWJhaS1wb2xpY2VzLXJlc3BvbnNlLXRvLW1hbi1zdHVjay1vbi1tb29uLWxlYXZlcy1pbnRlcm5ldC1jaHVja2xpbmcvNjg3ODQ3L2FtcA?oc=5