मुंबई बातम्या

मुंबई विद्यापीठी UG प्रवेशांची दुसरी यादी बुधवारी – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • मुंबई विद्यापीठी UG प्रवेशांची दुसरी यादी बुधवारी
  • २५ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता जाहीर होणार यादी
  • ऑनलाइन पडताळणी आणि शुल्क प्रक्रिया २६ ते ३० ऑगस्ट या कालावधीत

मुंबई विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेतील दुसरी गुणवत्ता यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थी ही यादी मुंबई विद्यापीठाचे अधिकृत संकेतसथळ mu.ac.in वर पाहू शकतात किंवा कॉलेजच्या संकेतस्थळावर पाहता येईल.

विद्यापीठाने जाहीर केलेल्या प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार दुसरी गुणवत्ता यादी २५ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता जाहीर होणार आहे. यानंतर ऑनलाइन पडताळणी आणि शुल्क प्रक्रिया २६ ते ३० ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.

पहिली गुणवत्ता यादी १८ ऑगस्ट रोजी जाहीर झाली होती. या यादीनुसार कट ऑफ टक्केवारीने अनेक महाविद्यालयांमध्ये ९८ टक्क्यांपर्यंतची देखील मजल गाठली होती.

मुंबई विद्यापीठ UG प्रवेशांची मेरीट लिस्ट कशी पाहाल?
– सर्वात आधी mu.ac.in या संकेतस्थळावर जा.
– होमपेजवरील मुंबई विद्यापीठ अॅडमिशन २०२१ लिंक पर्यायावर क्लिक करा.
– लॉग इन डिटेल्स भरा आणि सबमिट करा.
– आता दुसरी गुणवत्ता यादी स्क्रीनवर दिसेल.

ज्या विद्यार्थ्यांचे नाव पहिल्या गुणवत्ता यादीत नव्हते त्यांनी दुसरी यादी पाहावी. विद्यार्थ्यांना यंदा बारावीत भरघोस गुण मिळाले असल्याने दुसऱ्या यादीची कट ऑफ देखील वधारलेलीच राहण्याची शक्यता आहे.

पदवीच्या प्रथम वर्षाची कट ऑफ वधारली, जाणून घ्या डिटेल्स
imageडिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जांना मुदतवाढ
imageNEET UG परीक्षेच्या तीन दिवस आधी जाहीर होणार प्रवेश पत्र, जाणून घ्या डिटेल्स

Source: https://maharashtratimes.com/career/career-news/mumbai-university-ug-admissions-2021-second-merit-list-to-be-released-tomorrow/articleshow/85590753.cms