मुंबई बातम्या

Makar Sankranti : पतंग उडवतांना मांजा वापराल तर… मुंबई पोलिसांचे महत्त्वाचे आदेश – Sakal

महाराष्ट्र
sakal_logo

By

मुंबईः संक्रांतीनिमित्त पतंग उडवण्याची परंपरा आहे. परंतु पतंग उडविण्यासाठी ज्या नायलॉन मांजाचा वापर होतो, त्याने अनेकदा दुर्दैवी घटना घडतात. त्याच अनुषंगाने आज मुंबई पोलिसांनी महत्त्वाचे आदेश काढले आहेत.

मुंबई पोलिसांनी नायलॉन मांजाच्या वापर, विक्री आणि साठवणुकीवर बंदी घालणारा आदेश जारी केला आहे. आदेश 12 जानेवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत लागू राहील आणि उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असं पोलिसांनी आदेशामध्ये म्हटलं आहे.

पतंग उडवतांना दुसऱ्याच्या पतंगाची दोर कापण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर होतो. परंतु या मांजामुळे जीव जाण्याचे प्रकार घडत आहेत. हा मांजा इतका कडक असतो की तुटतही नाही आणि कापलाही जात नाही. कितीतरी पक्षी या मांजामुळे जिवानिशी गेले आहेत.

या मांजा गळ्याला घासल्यामुळे काही लोकांच जीवही गेलेला आहे. दुचाकी चालवत असतांना मांज घासून जखमी आणि मृत झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने मुंबई पोलिसांनी आज आदेश काढून असा मांजा वापरण्यास, त्याची विक्री करण्यास आणि साठवण्यावर बंदी घातली आहे. आदेशाचं उल्लंघन केल्यास कलम १८८ नुसार गुन्हा दाखल होणार आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMihwFodHRwczovL3d3dy5lc2FrYWwuY29tL21haGFyYXNodHJhL21ha2FyLXNhbmtyYW50aS1tdW1iYWktcG9saWNlLWlzc3Vlcy1hbi1vcmRlci1iYW5uaW5nLXRoZS11c2Utc2FsZS1hbmQtc3RvcmFnZS1vZi1ueWxvbi1tYW5qaGEtc25rODnSAYsBaHR0cHM6Ly93d3cuZXNha2FsLmNvbS9hbXAvbWFoYXJhc2h0cmEvbWFrYXItc2Fua3JhbnRpLW11bWJhaS1wb2xpY2UtaXNzdWVzLWFuLW9yZGVyLWJhbm5pbmctdGhlLXVzZS1zYWxlLWFuZC1zdG9yYWdlLW9mLW55bG9uLW1hbmpoYS1zbms4OQ?oc=5