मुंबई बातम्या

Mumbai Video: मेट्रो स्टेशनवरील थरारक घटना; तरुणीचा ड्रेस अडकला, ती झगडत राहिली पण… – Zee २४ तास

Mumbai Metro Train Accident Video: मुंबई म्हणजे धावपळीचं शहर… लोकल सेवा (Mumbai Local) म्हणजे मुंबईची रक्तवाहिनी. लोकल सेवा देखील अपूरी पडत असल्याने एसी ट्रेन (AC Train) आणि मेट्रो सेवा (Metro) सुरू करण्यात आल्या. त्यामुळे अनेकांचा प्रवास सुखकर झालाय. अशातच आता नव्या वर्षात एक धक्कादायक व्हिडिओ (Thriller Video) समोर आलाय. मेट्रो ट्रेनमध्ये चढताना एका तरुणीचा ड्रेस ट्रेनच्या दरवाज्यात अडकला. त्याचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ (Mumbai Metro Station Video) सध्या व्हायरल होत आहे.

मुंबईच्या चकाला स्टेशनवरील (Chakala Metro Station) ही घटना घडली आहे. एक तरुणी आपल्या कामानिमित्त घराबाहेर पडली. आकाशी रंगाच्या ड्रेसमध्ये ही तरुणी ट्रेनची वाट पाहत असते. मेट्रो आल्यावर ती थोडीशी गडबडल्यासारखी दिसत आहे. मेट्रोच्या दरवाज्याजवळ उभा असताना तिचा ड्रेस मेट्रोच्या दरवाज्यात अडकतो. (Girl clothes stuck in mumbai metro train at chakala station cctv Video goes viral on internet)

सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास ही घटना घडली. अडकलेला ड्रेस ओढण्याचा प्रयत्न तरुणीने केला. मात्र, तिला ते जमलं नाही. तेवढ्याच मेट्रो ट्रेन (Metro Station) सुरू झाली. तरुणीने ड्रेस सोडवण्यासाठी जिवाचा आटापिटा केला. ती झगडत राहिली. मात्र, शेवटी ती मेट्रो ट्रेन (Metro Train)… तिच्या स्पीडपुढे तरुणीचा निभाव लागला नाही.

आणखी वाचा – Niagara Falls Frozen : नायगरा धबधबा गोठला; खळाळून वाहणारं पाणी अधांतरी थांबलेलं कधी पाहिलंय का?

मेट्रोने स्पीड पडकल्याने तरुणी खाली पडली. तरुणी प्लॅटफॉर्मवरूनच (Metro Station Platform) फरफटत जात होती. तेवढ्यात तिला वाचवण्यासाठी अनेकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. तरुणी प्लॅटफॉर्मच्या रेलिंगच्या टोकापर्यंत फरफटत गेल्याचं दिसतंय. 

पाहा Video –

दरम्यान, 21 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर आता या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज (CCTV Video) समोर आलाय. घटनेनंतर तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतं. सूचनेचं पालन न केलेल्या प्रवाशांचा ट्रेन अपघात (Train Accident) झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. त्यामुळे प्रत्येकाने प्रवास करताना काळजी घेणं गरजेचं आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMimgFodHRwczovL3plZW5ld3MuaW5kaWEuY29tL21hcmF0aGkvbXVtYmFpL2dpcmwtY2xvdGhlcy1zdHVjay1pbi1tdW1iYWktbWV0cm8tdHJhaW4tYXQtY2hha2FsYS1zdGF0aW9uLWNjdHYtdmlkZW8tZ29lcy12aXJhbC1vbi1pbnRlcm5ldC1tYXJhdGhpLW5ld3MvNjc5NjE00gGeAWh0dHBzOi8vemVlbmV3cy5pbmRpYS5jb20vbWFyYXRoaS9tdW1iYWkvZ2lybC1jbG90aGVzLXN0dWNrLWluLW11bWJhaS1tZXRyby10cmFpbi1hdC1jaGFrYWxhLXN0YXRpb24tY2N0di12aWRlby1nb2VzLXZpcmFsLW9uLWludGVybmV0LW1hcmF0aGktbmV3cy82Nzk2MTQvYW1w?oc=5