मुंबई बातम्या

IIT बॉम्बे यंदा पावसाळ्यात करणार खास काम, मुंबईकरांना मिळणार मोठा फायदा – Sakal

मुंबई
sakal_logo

By

मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे म्हणजेच IIT बॉम्बेने (IIT Bombay) यंदाच्या वर्षी पावसाळ्यात मुंबईकरांसाठी मोठं काम करणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात आयआयटी बॉम्बेमधील हवामान विभागाशी संबंधित विद्यार्थांनी ट्वीटरच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी रीअल-टाइम फ्लड (Flood Map) नकाशे तयार करण्याची योजना आखली आहे. (IIT Bombay Work On Mumbai Flood)

हेही वाचा: भरती वेळी पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबई पालिका सज्ज; महापौरांची ग्वाही

याबाबत मंगळवारी @ClimatelTB या ट्विटर हँडलवरून एक ट्वीट करण्यात आले आहे. यामध्ये मुंबईकरांना #mumbaiflooddata आणि #mumbaiflood चा वापर करून यंदाच्या पावसाळ्यात त्यांच्या भागातील पुराची छायाचित्रे ट्वीट करण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्येक भागात ठराविक प्रमाणात पाऊस झाल्यास कसा पूर येण्याची शक्यता आहे हे मुंबईकरांना समजावे, तसेच ही माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध असावा यासाठी अशा प्रकारचे मॉडेल तयार करण्याची अंतिम योजना असल्याचा उल्लेख ट्वीटमध्ये करण्यात आला आहे.

हेही वाचा: मुंबईची ‘तुंबई’ यंदाही अटळ?; पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणतात…

फोटो ट्वीट करण्याचे आवाहन

हवामान विभागाशी संबंधित आंतरविद्याशाखीय कार्यक्रमाचे समन्वयक सुबिमल घोष यांनी सांगितले की, @ClimatelITB विद्यार्थ्यांना क्राउडसोर्सिंगद्वारे मुंबईतील पुराचे निरीक्षण करायचे आहे आणि ते सर्वांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून द्यायचे आहे. यासाठी आपण सर्वांनी या पावसाळ्यात आणि येत्या पावसाळ्यात आम्हाला मदत करा असे आवाहनही घोष यांनी केले आहे जेव्हा पूर पातळी उपलब्ध नसते तेव्हा आम्ही एकत्रितपणे पुराचे निरीक्षण करू शकतो असे ते म्हणाले.

हेही वाचा: दोन रुपयांत मिळणार एक लिटर शुद्ध पाणी, IIT कानपूरने बनवले उपकरण

सर्व डेटा एका वेब पोर्टलवर उपलब्ध असेल

घोष म्हणाले की, या सर्व योजनेसाठी एक स्वयंचलित प्रणाली तयार करण्यासाठी सांख्यिकीय मॉडेल वापरण्याची आमची योजना आहे. जिथे मुंबईकरांना विशिष्ट पावसामुळे किती पुराची काय स्थिती आहे याची माहिती दिली जाऊ शकते. यासाठी पहिल्या टप्प्यात संपूर्ण शहरातून डेटा गोळा करण्याची योजना असून, पूर नकाशे विशेषत: या उद्देशासाठी तयार केलेल्या वेब पोर्टलवर उपलब्ध असतील.

Web Title: Iit Bombay Monitor Mumbai Flood During Upcoming Monsoon With Tweets

Source: https://www.esakal.com/mumbai/iit-bombay-monitor-mumbai-flood-during-upcoming-monsoon-with-tweets-npk83