मुंबई बातम्या

अजित पवार म्हणाले, राज्याच्या अस्मितेला ठेच, फडणवीस म्हणाले, दादा मुंबई आपलीच, कुणाच्या बापाची नाही! – Maharashtra Times

नागपूर : मुंबई केंद्रशासित करावी अशी मागणी कर्नाटकच्या मंत्र्यांनी केली. मुंबई कर्नाटकचीच आहे, असे सांगून मराठी भाषिकांच्या प्रश्नावर मिठ चोळण्याचा प्रकार कर्नाटक सरकारने केला असल्याचा, मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. अजित पवार यांच्या मुद्द्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्याला झाप झाप झापले तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे त्यांची तक्रार करु, असेही विधानसभेला आश्वस्त केले.

मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही-देवेंद्र फडणवीस

केंद्रीय गृहमंत्र्यांकडे बैठक झाली तेव्हा नव्याने दावा करणार नाही, असे ठरले होते. कर्नाटकच्या मंत्र्यांनी केलेले दावे चुकीचे आहे. मुंबईवर दावा सांगणे हे खपवून घेतले जाणार नाही. निषेधाचे पत्र कर्नाटक सरकारला पाठवू. गृहमंत्र्यांसमोर जे ठरले आहे, त्याचे उल्लंघन करणे योग्य नसल्याचे त्यांना सांगितले जाईल. हे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले जाईल. कर्नाटकच्या अशा बोलघेवड्या लोकांना तंबी देण्याची विनंती गृहमंत्र्यांना केली जाईल. मुंबई महाराष्ट्राचीच ती कोणाच्या बापाची नाही. सभागृह म्हणून हा निषेध कर्नाटक सरकारला आणि केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच, फडणवीस आपण अमित शाहांना कळवा : अजित पवार

कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी एस अश्वथ नारायण यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी केली. त्यांच्या या वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देखील निषेध केला. महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच लागली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पत्र लिहून याचा निषेध व्यक्त केला पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे.

सरकार भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घातल असल्याचे सांगत विरोधकांचा विधानसभेतून सभात्याग

सरकार भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घातल असल्याचे सांगत विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला. त्यानंतर विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडण‌ीस यांनी आताचे विरोधक असलेल्या आणि तेव्हा सत्तेत असलेल्यांच्याच काळात टीईटी घोटाळा झाल्याचा मुद्दा मांडला. टीईटीच्या घोटाळ्याचे तार तेव्हाच मंत्र्यांपर्यंत गेले. हा पहिला पक्ष असेल, जो स्वत:च्या सत्ता काळातील घोटाळे बाहेर काढतो. टीईटीचा घोटाळ्याबाबत आधी बोलायला हवे. अब्दुल सत्तार यांच्या मुलीला नोकरी मिळालेली नसल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMi2QFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL25hZ3B1ci9tYWhhcmFzaHRyYS1hc3NlbWJseS13aW50ZXItc2Vzc2lvbi0yMDIyLWRldmVuZHJhLWZhZGFudmlzLXNsYW0ta2FybmF0YWthLW1pbmlzdGVyLWNzLWFzaHdhdGgtbmFyYXlhbi1vdmVyLWhpcy1jb250cm92ZXJzaWFsLXN0YXRlbWVudC1vbi1tdW1iYWkvYXJ0aWNsZXNob3cvOTY1NjU5MDAuY21z0gHdAWh0dHBzOi8vbWFoYXJhc2h0cmF0aW1lcy5jb20vbWFoYXJhc2h0cmEvbmFncHVyL21haGFyYXNodHJhLWFzc2VtYmx5LXdpbnRlci1zZXNzaW9uLTIwMjItZGV2ZW5kcmEtZmFkYW52aXMtc2xhbS1rYXJuYXRha2EtbWluaXN0ZXItY3MtYXNod2F0aC1uYXJheWFuLW92ZXItaGlzLWNvbnRyb3ZlcnNpYWwtc3RhdGVtZW50LW9uLW11bWJhaS9hbXBfYXJ0aWNsZXNob3cvOTY1NjU5MDAuY21z?oc=5