मुंबई बातम्या

Mumbai Crime Branch : काहीतरी मोठे करण्याच्या तयारीत असलेल्या इटालियन नागरिकांना मुंबई पोलिसांनी पकडले – News18 लोकमत

अमीत राय, मुंबई, 07 ऑक्टोंबर : मुंबई पोलिसांनी चार इटालियन नागरिकांना अटक केली. त्यांनी कोणाचीही परवानगी न घेता अहमदाबादमधील मेट्रोच्या डब्यांवर भित्तिचित्रे तयार करून गुन्हेगारी अतिक्रमण आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर या चार आरोपींनी गेल्या मुंबई मेट्रोमध्ये ग्राफ्टिंग करण्याच्या प्रयत्नात होते. परंतु त्यांच्यावर  वेळीच कारवाई केल्याने मोठा अनर्थ ठळल्याचे बोलले जात आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपी मागच्या दोन दिवसांपूर्वी सकाळच्या दरम्यान चारकोप मेट्रो यार्ड कॉम्प्लेक्समध्ये घुसले, परंतु कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे मेट्रोच्या बोगी असलेल्या ठिकाणी ते पोहोचू शकले नाहीत. या चारही जणांना त्यांचा हेतू साध्य करता आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. चारही आरोपींविरुद्ध सुरक्षा प्रभारींच्या तक्रारीवरून MHB पोलिसांनी भादंवि कलम 447 आणि 34 अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा : 100 कोटींचं ड्रग्ज, तस्कराची कल्पकता अधिकाऱ्यांनी ठेचली, मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

दरम्यान ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार जण तोंडाला मास्क लावलेले दिसत होते यावरून त्यांचावर संशय घेण्यात आला. गेल्या आठवड्यात सोमवारी सकाळी चारकोप यार्ड येथे ते मेट्रो ट्रॅक ओलांडताना ते दिसले, त्यानंतर चारकोप मेट्रोचे मुख्य सुरक्षा प्रभारी यांनी फुटेज पाहून सुरक्षा प्रभारींना बोलावून पूर्व-दक्षिण येथून प्रवास करणाऱ्या चार संशयितांची चौकशी केली. परिसराजवळील मेट्रो ट्रॅक ओलांडताना दिसले.  यानंतर त्यांचावर कारवाई करण्यात आली.

संशयित घाईत असल्याचे पाहून त्यांनी तात्काळ मुंबई पोलिसांना माहिती दिली. 26 सप्टेंबर रोजी MHB पोलिसांनी चार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करत चारकोप पोलिसांनी तपास सुरू केला. यामध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अखेर सुगावा लागला.

हे चौघे संशयित मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये राहत होते. ते ऑटोमधून चारकोप येथे आल्याचे तपासात समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या कर्मचार्‍यांची चौकशी केल्यानंतर हे चार लोक इटालियन नागरिक असल्याचे समोर आले आहे. ते गेल्या महिन्यात मुंबईत आले होते त्यानंतर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी मुंबईहून गुजरातला विमानाने गेले होते.

हे ही वाचा : दसऱ्यालाच ट्रेनमध्ये राडा, महिलांमध्ये फ्री स्टाईल, तुंबळ हाणामारीचा Video

त्यानंतर मेट्रोचे नुकसान केल्याप्रकरणी या चौघांना गुजरात पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली, मुंबई पोलिसांनी गुजरात पोलिसांशी संपर्क साधून या चौघांना मुंबईत आणले असून आता पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai/mumbai-crime-branch-italian-nationals-arrested-by-mumbai-police-sr-770449.html