मुंबई बातम्या

Mumbai Municipal News : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, महापालिकेकडून पाणी पट्टीत नवी दरवाढ – News18 लोकमत

मुंबई, 21 डिसेंबर : कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांत रखडलेली पाणी दरवाढ अखेर मुंबई महापालिका प्रशासनाने अंमलात आणले आहे. 2022-23मध्ये मुंबईकरांच्या पाणीपट्टीत 7.12 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जूनपासून पूर्वलक्षयी प्रभावाने लागू होणाऱ्या या दरवाढीच्या प्रस्तावाला पालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे. मुंबई महापालिकेने सन 2012 मध्ये पाणीपट्टीत प्रत्येकवर्षी कमाल आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

अशी आहे दरवाढ

झोपडपट्ट्या, चाळी, कोळीवाडे, गावठाण, आदिवासी पाडे 4.76 रु, झोपडपट्ट्यातील निवासी जलजोडण्या, प्रकल्पबाधित इमारती 5.28 रु, व्यावसायिक ग्राहकांसाठी 47.75 रु, बिगर व्यापारी संस्था 25.46 रु, उद्योगधंदे, कारखाने 63.55 रु, रेसकोर्स, फाईव्ह स्टार हॉटेल 95.49 रु, बाटलीबंद पाणी कंपन्या 132.64 रु.

हे ही वाचा : ऊर्जामंत्री बोलत असतानाच वीज गेली; रोहीत पवार यांचा निशाणा, म्हणाले आतातरी..

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज 3850 दशलक्ष लिटर शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेला वर्षभरात कोट्यवधींचा खर्च करावा लागतो. त्यामुळे पाणीपुरवठ्याला लाभ मिळणाऱ्या प्रकाराप्रमाणे पालिकेकडून प्रत्येकी एक हजार लिटरमागे पाणीपट्टी आकारली जाते.

महापालिकेने 2012 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी किमान 8 टक्के पाणीपट्टी वाढवता येते, मात्र मार्च 2020 पासूनच्या कोरोना प्रभावामुळे पाणीपट्टी वाढवण्यात आली नव्हती. मात्र या वर्षी पाणीपट्टी वाढ करण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. दरम्यान, पालिकेला दरवाढीमुळे 91.46 कोटींचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे.

हे ही वाचा : मुख्यमंत्री शिंदेंवर भुखंडाचे श्रीखंड लाटण्याचा आरोप, विरोधकांनी केली राजीनाम्याची मागणी

बेस्टच्या वीज विभागाकडून मुंबई शहरातील सुमारे दहा लाख 80 हजार ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. यामध्ये आठ लाख 50 हजार तर दोन लाख दहा हजार व्यावसायिक ग्राहक आहेत. या ग्राहकांना प्रत्येक महिन्याचे बिल संबंधित विभागाकडून ग्राहकांना पाठवण्यात येते. हे बिल ऑनलाइन भरण्याची सुविधाही ‘बेस्ट’कडून करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMijAFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL211bWJhaS9tdW1iYWktbXVuaWNpcGFsLW5ld3MtdXNlLXdhdGVyLXNwYXJpbmdseS1uZXctd2F0ZXItdGFyaWZmLWhpa2UtZnJvbS1tdW5pY2lwYWwtY29ycG9yYXRpb24tbWhzci04MDMwMTUuaHRtbNIBkAFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL2FtcC9tdW1iYWkvbXVtYmFpLW11bmljaXBhbC1uZXdzLXVzZS13YXRlci1zcGFyaW5nbHktbmV3LXdhdGVyLXRhcmlmZi1oaWtlLWZyb20tbXVuaWNpcGFsLWNvcnBvcmF0aW9uLW1oc3ItODAzMDE1Lmh0bWw?oc=5