मुंबई बातम्या

Urfi Javed : उर्फी जावेदला बलात्कार अन् जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या – News18 लोकमत

विजय वंजारा, प्रतिनिधी

मुंबई, 21 डिसेंबर : टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करणारी उर्फी जावेद कायमच चर्चेत असते. उर्फीवर तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीकाही होते. काहींनी तर उर्फी जावेदला फोनवरही धमक्या द्यायला सुरूवात केली. उर्फी जावेदला एका व्यक्तीकडून बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकराची तक्रार उर्फीने पोलिसांकडे केली. यानंतर आता पोलिसांनी उर्फीला धमकी देणाऱ्याला अटक केली आहे.

काहीच दिवसांपूर्वी ब्रोकर नवीन गिरी याने उर्फीला व्हॉट्सएऍपवरून बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिली, त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बिहारमधून अटक केली. मुंबई पोलिसांनी पाटणामधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

उर्फी जावेदने गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती, यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. नवीन गिरी उर्फीला दरवेळी नव्या नंबरवरून धमकी देत असे. सहा दिवसांपूर्वी उर्फीने गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. उर्फीने आरोपीचे कॉल रेकॉर्डिंग पुरावे म्हणून दिले, यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. यानंतर त्याला अटक करण्यात आली. नवीन गिरी याच्याविरोधात पोलिसांनी 354, (ए), 354 (डी), 509, 506 अन्वये एफआयआर दाखल केला आहे. नवीनची रवानगी आता कारागृहात करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMicWh0dHBzOi8vbG9rbWF0Lm5ld3MxOC5jb20vY3JpbWUvbXVtYmFpLXBvbGljZS1hcnJlc3RlZC1tYW4tZnJvbS1iaWhhci1mb3ItdGhyZWF0ZW5pbmctdXJmaS1qYXZlZC1taHNkLTgwMzI5MS5odG1s0gF1aHR0cHM6Ly9sb2ttYXQubmV3czE4LmNvbS9hbXAvY3JpbWUvbXVtYmFpLXBvbGljZS1hcnJlc3RlZC1tYW4tZnJvbS1iaWhhci1mb3ItdGhyZWF0ZW5pbmctdXJmaS1qYXZlZC1taHNkLTgwMzI5MS5odG1s?oc=5