मुंबई बातम्या

अनिल देशमुखांना झटका, 12 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा ईडी कोठडी, मुंबई हायकोर्टाचा निर्णय – TV9 Marathi

ANIL DESHMUKH

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायलयीन कोठडीला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. ED ने सेशन्स कोर्टाची कालच्या ऑर्डरला चॅलेंज करण्यात आलं होतं. मुंबई हायकोर्टानं अनिल देशमुख यांनी पुन्हा 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.ईडीच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती माधव जमादार यांच्या बेंच पुढे सुनावणी झाली आहे. ईडी आता अनिल देशमुख यांना ताब्यात घेईल. अनिल देशमुख यांना जेल कोठडीतून ईडी कोठडीत आणलं जाईल.

अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकणी 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीची मुदत शनिवारी संपत असल्यानं त्यांना काल कोर्टात हजर केलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अनिल देशमुख यांना ईडी कोठडी द्यावी, अशी अंमलबजावणी संचलनालयाची मागणी होती. ईडीनं आता सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतल्यानंतर अनिल देशमुख यांना पुन्हा ईडी कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

ऋषिकेश देशमुख यांना दिलासा नाही

दुसरीकडे ईडीनं अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना गुरुवारी (5 नोव्हेंबरला) हजर होण्याचं समन्स दिलं होतं. मात्र, त्यांनी ईडीसमोर हजर होण्याऐवजी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, ऋषिकेश देशमुख यांचा अटकपर्व जामीन फेटाळण्यात आलाय.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

इतर बातम्या:

[embedded content]

धनंजय मुंडेंतर्फे आयोजित कार्यक्रमात सपना चौधरीचे ठुमके, मेटे म्हणतात, सामाजिक मंत्र्यांचं भान…

‘उडता पंजाब’ नंतर ‘उडता महाराष्ट्र’ करण्याचा गेम होत; नवाब मलिक यांचा दावा

अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार, ईडीची हायकोर्टात धाव, न्यायालयीन कोठडीला चॅलेंज

Bombay High Court sent Anil Deshmukh to ED custody in Money Laundering case till 12 November

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/bombay-high-court-sent-anil-deshmukh-to-ed-custody-in-money-laundering-case-till-12-november-573387.html