मुंबई बातम्या

VIDEO: बापरे! मुंबई-गोवा महामार्गावर पाण्याखाली, विसर्जन करून मुंबईत परणाऱ्या चाकरमन्यांचे हाल – News18 लोकमत

सिंधुदुर्ग : मुंबईसह उपनगर आणि कोकण भागात पाऊस सुरू आहे. विसर्जनानंतर कोकणात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. सिंधुदुर्गात तुफान पाऊस झाला. मुंबई गोवा महामार्गावर अक्षरश: पाणी साठल्याचं पाहायला मिळालं.

अचानक सुरु झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत महामार्गावर तसेच गावातील रस्त्यावर पाणी साचलं. काल गणरायाचे विसर्जन करून परतणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र हाल यामुळे खूप हाल होत आहेत. मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना खूप त्रास होत आहे.

पावसामुळे आणि पाणी साचल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. सतत पाऊस सुरू राहिल्यास जिल्हयात निर्माण होऊ शकते आपत्कालीन स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी भागात पावसाचा जोर कायम आहे.

पालघर मध्ये पावसाचा यल्लो अलर्ट देण्यात आला आहे . विजांच्या कडकडाटासह पालघरच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू. पहाटे पासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पालघर मध्ये पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. डहाणू , तलासरी , विक्रमगड परिसरात पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे.

11 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता तर 12 , 13 , 14 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात पाऊस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

महाराष्ट्र

महाराष्ट्र

Published by:Kranti Kanetkar

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/maharashtra/heavy-rainfall-flood-in-mumbai-goa-highway-traffic-mhkk-759101.html