मुंबई बातम्या

Mumbai, Karnak Bridge : मुंबईतील कर्नाक बंदर पूलाजवळील दुकानं तोडणार, नागरिकांचा विरोध होण्याची शक्यता – TV9 Marathi

मुंबईतील कर्नाक बंदर पूलाची मुंबई लिकेकडून पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. हा पूल पाडून पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. पूल बंद करण्यासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. 

मुंबईतील कर्नाक बंदर पूलाजवळील दुकानं तोडणार

Image Credit source: social

मुंबई : मुंबईतील (Mumbai) कर्नाक बंदर पूलाची मुंबई महापालिकेकडून (BMC) पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. परंतु या पुनर्बांधणी आधी जुना पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पाडकामादरम्यान अडथळा ठरणारे स्टॉल आणि व्यायामशाळा पालिका तोडणार आहे. यामुळे आता याविरोधात विभागतील नागरिक आक्रमक होत रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. आयआयटी मुंबई (IIT Mumbai) आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त पाहणीत कर्नाक पुल धोकादायक ठरवण्यात आलेला आहे. हा पूल पाडून याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. पूल बंद करण्यासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. येत्या काही दिवसात कर्नाक पूल पाडकामाला सुरुवात होईल, असे मध्य रेल्वेनं कळवले आहे. दरम्यान, या सर्व कामात मोठा गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांचा विरोधही होण्याची शक्यता आहे.

कर्नाक बंदर पूल

  1. – पुलाचे निर्मिती वर्ष  – 1866-67
  2. – जड वाहतुकीसाठी पुलाचा वापर बंद – ऑगस्ट 2014
  3. – पूल पाडणे – 20 ऑगस्ट ते 20 नोव्हेंबर
  4. – पुलाची पुनर्बांधणी – 20 नोव्हेंबर 2022 ते 20 जून 2024
  5. – पूल पाडणारी आणि जोडरस्ता उभारणारी यंत्रणाः मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिका
  6. – मुंबई वाहतूक पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र
  7. – मध्य रेल्वेकडून या आठवड्यात पाडकाम
  8. – महापालिकेकडून वाहतूक नियोजनासाठी वार्डन

वाहतूक कोंडीची भीती

  1. – शहरातील प्रमुख पुलांमध्ये कर्नाक बंदर पुलाचा समावेश
  2. – पूल बंद झाल्यानंतर मुक्तमार्ग सोडल्यानंतर सीएसएमटी, फोर्ट दिशेला जाणाऱ्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वाहतूक पोलिसांच्या सूचना
  3. – संभाव्य कोंडी लक्षात घेता वाहतूक नियोजनासाठी 70 वाहतूक मदतनीस (वॉर्डन), 100 चमकणारे दिवे (ब्लिनकर्स), 50 रिफ्लेकटर जॅकेट, 50 बटन आणि 50 दिशादर्शक फलक उपलब्ध करून द्याव्यात.
  4. – आप्तकालीन परिस्थिती उदभवल्यास बंद पडलेली वाहने हटवण्यासाठी एक हेवी लोड क्रेन २४ तास उपलब्ध करून द्यावी.

ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त

पूल बंद करण्यासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. येत्या काही दिवसात कर्नाक पूल पाडकामाला सुरुवात होईल, असे मध्य रेल्वेनं कळवले आहे. दरम्यान, या सर्व कामात मोठा गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांचा विरोधही होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

70 वॉर्डन आणि वाहतूक पोलिसांनी मागणी

वाहतूक नियोजनासाठी 70 वॉर्डन आणि वाहतूक पोलिसांनी मागणी केलेले सहित्य उपलब्ध करून घ्यावे, अशी सूचना मध्य रेल्वेने महापालिकेला केली आहे. येत्या काही दिवसात मदतनीस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/mumbai-shops-near-karnak-port-bridge-in-mumbai-will-be-demolished-there-is-a-possibility-of-opposition-from-citizens-au167-790659.html