मुंबई बातम्या

Mumbai New Guidelines: मुंबई पालिकेकडून नवीन गाइडलाइन्स जारी; होम डीलिव्हरीबाबत मोठा निर्णय – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • मुंबई महापालिकेने जारी केल्या सुधारित गाइडलाइन्स.
  • खाद्य पदार्थ व अत्यावश्यक वस्तूंची २४x७ होम डीलिव्हरी.
  • वीकेंड लॉकडाऊनला हॉटेलमध्ये जावून पार्सल आणू शकत नाही.

मुंबई: राज्यात करोना संसर्गाची स्थिती गंभीर होत चालली आहे. त्यातही मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांतील करोनाचे आकडे आरोग्य यंत्रणांची झोप उडवणारे ठरले आहेत. मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ८० लाखांच्यावर पोहचला असून आता अधिक दक्षता बाळगावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत कोविड निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून आधी ज्या गाइडलाइन जारी करण्यात आल्या होत्या त्यात आज काही बदल करण्यात आले आहेत. ( Mumbai New Guidelines Latest News Update )

वाचा: राज्यात करोनाने गाठला नवा उच्चांक; आज ५९ हजारांवर नवे रुग्ण, ३२२ मृत्यू

महाराष्ट्रातील करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन ५ एप्रिल ते ३० एप्रिल या दरम्यान प्रत्येक वीकेंडला शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कडक लॉकडाऊन आणि इतर दिवशी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधांची अंमलबजावणी करताना प्रत्येक महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला स्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसारच मुंबई पालिकेने आधीच्या आदेशात काही बदल केले आहेत. त्यात होम डीलिव्हरी तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांबाबत दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा: करोनाची आताची लाट प्रचंड मोठी!; लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

अशा आहेत नवीन गाइडलाइन्स…

– विद्यार्थी वा उमेदवार परीक्षा केंद्र गाठण्यासाठी पालकासह (एक पालक) प्रवास करू शकतील. सोबत वैध हॉल तिकीट असणे आवश्यक आहे.

– खाद्य पदार्थ आणि अत्यावश्यक वस्तूंची २४x७ होम डीलिव्हरी करता येईल. ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपन्यांमार्फतच होम डीलिव्हरी करणे बंधनकारक असेल.

– वीकेंड लॉकडाऊनवेळी हॉटेलमध्ये प्रत्यक्ष जावून पार्सल आणता येणार नाही. हॉटेल होम डीलिव्हरी करू शकतं.

– वीकेंड लॉकडाऊन दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेले फूडस्टॉल तसेच फळ विक्रेते पार्सल आणि टेक अवे सेवा देवू शकतात. स्टॉलजवळ उभं राहून पदार्थ खाण्याची परवानगी नसेल.

– मोलकरीण, आचारी, चालक, मदतनीस, नर्स आणि वैद्यकीय सहायक यांना परवानगी असेल. सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तीला घरी जावून ते सेवा देवू शकतील.

– नेत्र विकार तज्ञ तसेच चष्म्याची दुकानं राज्य सरकारने जी वेळ ठरवून दिली आहे त्या वेळेत सुरू ठेवता येतील.

वाचा: केंद्रीय मंत्री बरसले, ‘महाराष्ट्राच्या उदासिनतेमुळे देशाच्या प्रयत्नांना खीळ’

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bmc-allows-online-delivery-of-food-essential-supplies-on-all-days/articleshow/81957109.cms