मुंबई बातम्या

Video : वाहतूक कोंडीचं विघ्न कधी हरणार? मुंबई-नाशिक महामार्गावर 7 किमी वाहनांच्या रांगाच रांगा – News18 लोकमत

भिवंडी, 2 सप्टेंबर : भिवंडी तालुक्यातील मुंबई – नाशिक महामार्गावरील माणकोली ते माजिवाडा दरम्यान आज सायंकाळी साडे चार वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. याचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. या भागात सहा ते सात किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याने अनेक प्रवाशी अडकून पडले आहे.

सध्या गणेशोत्सव सुरू असून त्यात उद्या शनिवार, रविवार अशा दोन दिवस सुट्ट्या असल्याने अनेक नागरिक बाहेर पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर मार्गावर खड्डे असल्याने मुंबईवरून नाशिकच्या दिशेने जाणारा मार्ग ठप्प झाला आहे. त्याशिवाय मुंबईकडे जाणाऱ्या  मार्गांवरही वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडी वाढत असल्याने प्रवाशी चांगलेच त्रस्त झाले आहेत. त्यामुळे बाहेर गावी जाण्यासाठी माहिती घेऊनच घराबाहेर पडा असे आवाहन केलं जात आहे.

या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये लांबच्या लांब वाहनांच्या रांगा दिसून येत आहे. सण-उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांना सहन करावा लागतो. त्यात जर शनिवार-रविवार हे सुट्टीचे दिवस आले तर वाहतूक कोंडीमध्ये अधिक भर पडते.

पुण्यात तेदेखील शहरांमध्ये वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. मेट्रोच्या कामामुळे चांदणी चौकात सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. काही दिवसांपूर्वी पुणेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा याच ठिकाणी अडवला होता. आणि पुण्यातील वाहतुकीच्या कोंडीवर तोगडा काढावा, अशी विनंती केली होती.

तुमच्या शहरातून (नाशिक)

नाशिक

नाशिक

Published by:Meenal Gangurde

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/maharashtra/nashik/video-7-km-long-queue-of-vehicles-on-mumbai-nashik-highway-mhmg-755468.html