मुंबई बातम्या

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात गुजरातच्या आशिष नेहराने केली चिटींग, होऊ शकते कारवाई – Maharashtra Times

मुंबई : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामटन्यात गुजरातचा प्रशिक्षक आशिष नेहरानेच चिटींग केल्याचे पाहायला मिळाले. नेहराने यावेळी काही नियम मोडले, त्यामुळेच त्याला चाहत्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
नेमकं घडलं तरी काय, पाहा…
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार झाला होता. या सामन्यातील १३ व्या षटकात एक अशी गोष्ट घडली की, त्यामुळे आता नेहरा चांगलाच ट्रोल व्हायला लागला आहे. कारण यावेळी नेहराने चिटींग केल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी मुंबईचा कायरन पोलार्ड हा फलंदाजी करत होता. त्यावेळी पोलार्डच्या विरोधात गुजरातच्या गोलंदाजांची जोरदार अपील केली होती. पण मैदानातील पंचांनी मात्र त्याला बाद दिले नाही. पोलार्ड हा आऊट आहे, असे गुजरातच्या खेळाडूंना वाटत होते. त्यामुळे गुजरातचे खेळाडू यावेळी डीआरएस घेण्याचा विचार करत होते. गुजरातचे खेळाडू आता डीआरएस घेणार असे वाटत असतानाच नेहराने त्यांना इशारा केला. हा चेंडू स्टम्पच्या वरून जात आहे, त्यामुळे डीआरएस घेऊन काहीही फायदा होणार नाही, असे नेहराने इशाऱ्याने गुजरातच्या खेळाडूंना सांगितले. त्यामुळे गुजरातच्या खेळाडूंनी यावेळी डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला नाही. पण ही गोष्ट नियमांमध्ये बसत नाही. कारण मैदानातील निर्णय हे खेळाडूंनी घ्यायचे असतात. प्रशिक्षक या खेळाडूंना मैदानाबाहेर मार्गदर्शन करू शकतो किंवा टाइम आऊटच्या वेळी प्रशिक्षक मैदानात येऊन खेळाडूंना काही सल्ले देऊ शकतो. पण नेहराने जी गोष्ट केली ती नियमांत बसणार नाही. त्यामुळे जेव्हा मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना जेव्हा नेहराने चिटींग केल्याचे समजले तेव्हा त्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे. पण ही गोष्ट जर सामनाधिकाऱ्यांना समजली किंवा नेहराची कोणी तक्रार केली तर नक्कीच त्याच्यावर कारवाी केली जाऊ शकते. कारम डग आऊटमध्ये बसून मैदानातील खेळाडूंना मार्गदर्शन करणे हे नियमांत बसणारे नाही. त्यामुळे आता नेहरावर सामनाधिकारी कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

ही चिटींग करूनही गुजरातला या सामन्यात पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ ठरलेल्या गुजरात टायटन्सचा ५ धावांनी पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्साचा हा सलग दुसरा विजय ठरला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात मुंबईने गुजरातवर मात केलीच त्याच बरोबर त्यांना प्लेऑफमधील स्थान पक्के होण्यासाठी आणखी वाट पाहायला लावली. अखेरच्या षटकात गुजरातला विजयासाठी ९ धावांची गरज होती. पण मुंबईच्या डेनियल सॅम्सने अशक्य वाटणारी गोष्ट करून दाखवली. त्याने ६ चेंडूत फक्त ३ धावा दिल्या. त्यामुळेनेहराने चिटींग करूनही गुजरातच्या संघाला सामना जिंकता आला नाही.

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt22/news/ashish-nehra-breach-code-of-conduct-against-mumbai-indians-so-match-referee-may-cause-action/articleshow/91400550.cms