मुंबई बातम्या

मुंबई : विनापरवाना श्‍वान पाळणाऱ्यांची पालिकेकडून शोधमोहीम सुरू – Sakal

मुंबई
sakal_logo

By

मुंबई : पालिकेचा (mumbai carporation) परवाना न घेता श्‍वान (pet dog) पाळणाऱ्यांविरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे. पालिकेने अशा श्‍वानांसाठी शोधमोहीम हाती घेतली असून, परवाना(License) नसल्यास तो तत्काळ उपलब्ध करून दिला जाणार आहे. मात्र, त्याला मालकाने विरोध केल्यास श्‍वान जप्त करण्याचीही कारवाई होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: कोल्हापूर : शाळा, कॉलेजमध्येच मिळावेत दाखले

मुंबईत साधारण ४० हजाराहून अधिक पाळीव श्‍वान असल्याचा अंदाज आहे. मात्र, प्रत्यक्षात १० ते १२ हजार श्‍वानांचा परवाना घेण्यात आला आहे. अवघ्या १५० रुपयांत महापालिकेकडून (bmc) ऑनलाईन परवाना उपलब्ध करून दिला जातो. तरीही परवाना न घेता श्‍वान पाळण्याचे प्रमाण कमी होत नाही. ‘पाळीव श्‍वानांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ परवाना उपलब्ध करून देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे,’असे महापालिकेच्या पशू कल्याण व देवनार कत्तलखान्याचे महाव्यवस्थापक डॉ. के. ए. पठाण यांनी सांगितले. पालिकेच्या कायद्यानुसार परवाना घेऊनच श्‍वान पाळावा लागतो. परवाना नसलेले श्‍वान जप्त करण्याचा पालिकेला अधिकार आहे. आताही मालकांकडून परवाना घेण्यास टाळाटाळ केल्यास श्‍वान जप्त करण्याचे अधिकार पालिकेला आहेत.

२० टक्क्यांहून अधिक दंश पाळीव श्‍वानांचे

मुंबई २०१८ ते २०२० या चार वर्षात तीन लाख १५ हजार २२२ नागरिकांना श्‍वानांनी चावा घेतला आहे. यातील २० ते २५ टक्के श्‍वान हे पाळीव असल्यचे समोर आले आहे.

हेही वाचा: लोकशाहीसाठी शिखर परिषदेचे प्रयोजन काय ?

श्‍वान परवान्याच्या अटी

  1. श्‍वान परवाना घेताना श्‍वानाला रेबिजसह इतर आवश्‍यक लसी दिल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक.

  2. श्‍वान सार्वजनिक ठिकाणी घाण करणार नाही याची मालकाला हमी द्यावी लागते.

  3. श्‍वानांपासून धोका काय?

  4. श्‍वान चावण्याचा अथवा नखे मारण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे.

  5. श्‍वानाच्या मलमुत्रातून लेप्टोचा अाजार पसरू शकतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी श्‍वानाने घाण न करण्याची हमी घेतली जाते.

  6. महापालिकेने काही वर्षांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या श्‍वानांच्या मालकांकडून दंडवसुी सुरू केली होती. मात्र, ही कारवाई बारगळली.

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-municipal-corporation-started-search-operation-for-unlicensed-dog-keepers-tmb01