मुंबई बातम्या

Mumbai Lockdown Updates: अनलॉक सुरू झाल्याच्या दोनच दिवसात मुंबईतील मॉल्सचे शटर डाऊन – News18 लोकमत

मुंबई, 18 ऑगस्ट : राज्यात 15 ऑगस्टपासून सर्व मॉल्सनां रात्री 10 वाजेपर्यंत खुले राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र अनलॉक सुरू झाल्याच्या (Mumbai Unlock) दोनच दिवसात मुंबईतील मॉल्स बंद होण्यास सुरुवात झाली आहे. अधिकतर मोठ मोठे मॉल्स अवघे दोन दिवस सुरू होते, मात्र मंगळवारी पुन्हा मॉल्सचे शटर डाऊन करण्यात आले आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या नव्या नियमावलीमुळे मॉल्स मालकांच्या नाकी नऊ आले आहेत. राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार, सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे (Fully Vaccinated) दोन डोज घेणं बंधनकारक असणार आहे. (Mumbai Lockdown Updates)
अनेक मॉल्सचे मालक आणि व्यवस्थापकांचं म्हणणं आहे की, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal, BMC Commissioner) यांनी केवळ मौखिक आश्वासन दिलं होतं, जे पूर्ण झालं नाही. आयुक्त म्हणाले होते की, ज्या कर्मचाऱ्यांनी एक लशीचा डोस घेतला असेल अशा कर्मचाऱ्यांनाही काम करण्यास परवानगी दिली जाईल. मात्र राज्य सरकारने 16 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, त्यांनी नियम अधिक कडक केले आहेत. नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या अटींनुसार, सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोज आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या डोसच्या 14 दिवसांनंतरच त्यांना काम करण्याची परवानगी असेल. त्यामुळे मॉल्सचे मालक आणि व्यवस्थापकांनी सध्या मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
इनॉरबिट, इनफिनिटी, R City,फीनिक्स सारखे मॉल्स बंद
जेव्हा मालाडमधील इनॉरबिट आणि इन्फिनिटी हॉलला पोहोचले आणि त्यांनी पाहिलं की, हे सर्व बंद आहेत. या प्रमाणे कांदिवलीत ग्रोवर 101 आणि घाटकोपरमधील R City सारखे मॉलदेखील बंद आहेत. या प्रमाणे लोअर परेलमधील फिनिक्स मॉलदेखील मंगळवारी बंद होते. मात्र ठाण्याबाबत सांगायलं झालं तर विवियाना मॉल आणि कोरम मॉल खुले आहेत.
मॉल मालक आणि व्यवस्थापकांचं काय आहे म्हणणं?
एक वक्तव्य जारी करीत शॉपिंग सेंटर्स असोसिएश ऑफ इंडिया (Shopping Centers Association of India) कडून सांगण्यात आलं आहे की, जे नियम लावण्यात आले आहेत, ते पाहता मॉल खोलणं शक्य नाही. त्यांचं म्हणणं आहे की, सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण होण्यासाठी कमीत कमी एक महिन्याचा कालावधी लागेल. ते देखील जेव्हा लस सहज उपलब्ध असेल तेव्हाच हे शक्य होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या डोसच्या 14 दिवसांनंतर परवानगी दिली असल्याने तोपर्यंत मॉल्स बंद ठेवावे लागतील.
हे ही वाचा-Delta Variant ची दहशत! एक कोरोना रुग्ण सापडताच संपूर्ण देश लॉकडाऊन
मॉल्स मालक आणि व्यवस्थापकांचं म्हणणं आहे की, त्यांचे अधिकतर स्टाफ 45 वर्षांहून लहान आहेत. 18 ते 44 वर्षांत लसीकरण मे महिन्यापासून सुरू झालं आहे. यानंतर ही मोहीम लस कमी असल्यामुळे रोखण्यात आली. यानंतर केंद्र सरकारने दोन डोसमधील अंतर वाढवून 30 ते 45 दिवसांपर्यंत केलं आहे. या कारणामुळे अधिकतर कर्मचारी केवळ एकच डोस घेऊ शकले. त्यामुळे पाहिलं तर सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण होणे सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत चालेल. जर परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन डोसमधील कमी केलं जाऊ शकतं, तर कर्मचाऱ्यांना हा नियम का लागू केला जाऊ शकत नाही? सध्या मॉल मालकांनी मागणी केली आहे की, एक डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्याची परवानगी दिली.

Source: https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-lockdown-updates-malls-in-mumbai-started-live-closing-within-two-days-of-the-unlock-mhmg-593723.html