मुंबई बातम्या

BARC Mumbai Recruitment: भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई इथे भरती; तब्बल 86 हजार पगार – News18 लोकमत

मुंबई, 18 ऑगस्ट:  भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई (Bhabha Atomic Research Centre) इथे एकूण 25 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि निवासी वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांना थेट मुलाखत द्यायची आहे. मुलाखतीची तारीख 20 ऑगस्ट 2021असणार आहे.

या पदांसाठी भरती

पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (Post Graduate Resident Medical Officer)
कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर (Junior/Senior Resident Doctor)
निवासी वैद्यकीय अधिकारी (Resident Medical Officer)

शैक्षणिक पात्रता

पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (Post Graduate Resident Medical Officer) – MS/MD/DNB डिग्री आणि डिप्लोमा
कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर (Junior/Senior Resident Doctor) – MBBS
निवासी वैद्यकीय अधिकारी (Resident Medical Officer) – MBBS

हे वाचा – NDA म्हणजे नक्की काय? NDAमध्ये भरती होण्यासाठी काय योग्यता आवश्यक? जाणून घ्या

इतका मिळणार पगार

पहिलं वर्ष –  86,000/- प्रतिमहिना
दुसरं वर्ष –  88,000/- प्रतिमहिना
तिसरं वर्ष –  90,000/- प्रतिमहिना
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

Published by:Atharva Mahankal

First published:

Source: https://lokmat.news18.com/career/bhabha-atomic-research-centre-barc-recruitment-openings-for-different-posts-mham-593678.html