मुंबई बातम्या

मुंबई महानगरपालिका शाळांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा रद्द – Loksatta

मुंबई : पाचवी व आठवीच्या वर्गासाठी संपूर्ण राज्यात शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाणार असली तरी मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येणार नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका शाळांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यास पालिकेच्या शिक्षण विभागाने नकार दिला आहे. त्यामुळे पालिकेच्या शाळेतील सुमारे आठ हजार विद्यार्थी या परिक्षेपासून वंचित राहणार आहेत.

सुरुवातीला ८ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा दोनवेळा पुढे ढकलून १२ ऑगस्ट रोजी घेण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने के ले आहे. मात्र, मुंबई वगळून ही परीक्षा आता होणार  आहे. मुंबई महानगर पालिका शाळांमध्ये ही परीक्षा आयोजित न करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

मुंबईतील करोनाची स्थिती पाहता ऑगस्टअखेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घ्यावी किं वा परीक्षा पुढे ढकलावी, असे आम्ही परीक्षा मंडळाला कळवले होते. मुंबईत कोणत्याही परीक्षा घेणे, शाळा सुरू करणे याबाबचे अधिकार राज्य सरकारने पालिका आयुक्तांना दिले आहेत. आयुक्तांनी प्रत्यक्ष परीक्षा घेण्यास नकार दिलेला असल्याचेही त्यांना कळवले होते. मात्र परीक्षा घेण्यावर ते ठाम असल्यामुळे आम्ही करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी सांगितले. राज्यात इतर ठिकाणी मात्र ही परीक्षा होणार असल्याचे परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on August 11, 2021 3:16 am

Web Title: scholarship examination for mumbai municipal school canceled zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/scholarship-examination-for-mumbai-municipal-school-canceled-zws-70-2559413/