मुंबई बातम्या

आता गूगल मॅपवर मिळणार रस्ता बंद असल्याची माहिती; मुंबई महापालिकेचा उपक्रम, नागरिकांचा वेळ वाचणार – TV9 Marathi

Image Credit source: TV9 Marathi

एखादा रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल, किंवा त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू असेल तर तुम्हाला त्याबद्दल आधीच गूगल मॅपच्या मदतीने माहिती मिळणार आहे. एवढेच नव्हे तर वाहतुकीसाठी पर्यायी कोणता रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे, याची माहिती देखील तुम्हाला गूगल मॅपच्या मदतीने मिळणार आहे.

मुंबई : तुम्ही बाईकवर आहात, प्रचंड ट्राफिकचा सामना करून तुम्हाला एखाद्या स्थळी पोहोचायचे आहे. तुम्ही वाहतूककोंडीला तोंड देत देत तुमच्या इच्छित स्थळाजवळ पोहोचले आणि थोडे अलिकडेच तुम्हाला समजले संबंधित रस्त्याचे काम सुरू असल्याने तो रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. अशावेळी तुमच्यावर विनाकारण पश्चतापाची वेळ येते, कारण पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करत तुम्हाला पर्यायी मार्गाचा शोध घ्यायचा असतो. हीच अडचण दूर करण्यासाठी आता मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. समजा एखादा रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल, किंवा त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू असेल तर तुम्हाला त्याबद्दल आधीच गूगल मॅपच्या (Google Map) मदतीने माहिती मिळणार आहे. एवढेच नव्हे तर वाहतुकीसाठी (Transportation) पर्यायी कोणता रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे, याची माहिती देखील तुम्हाला गूगल मॅपच्या मदतीने मिळणार आहे.

मुंबई महापालिकेकडून चाचणी

या पार्श्वभूमीवर महापालिकेने वरळी येथील गणपतराव कदम मार्गावर सुरू असलेल्या रस्तेकामाच्या वेळी प्रायोगिक तत्वावर चाचणी केली. ही चाचणी यशस्वी झाली आहे. चाचणी यशस्वी झाल्याने आता संपूर्ण मुंबईमध्ये ही संकल्पाना राबवण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या तंत्रज्ञान खात्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे. समजा मुंबईच्या एखाद्या भागातील रस्ताा वाहतुकीसाठी बंद असल्यास याची माहिती सर्वप्रथम महापालिकेच्या वतीने लेप्टन या संस्थेच्या वतीने गूगला कळवण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित रस्त्याबाबतची माहिती मॅपवर अपडेट केली जाणार आहे.

नागरिकांचा वेळ वाचणार

मुंबई महापालिकेचा हा एका चांगला उपक्रम असून, यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी घराबाहेर पडला आहात, काही अंतर गेल्यानंतर तुम्हाला समजे की पुढे रस्त्याचे काम चालू असून, रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे, तर तुमचा वेळ वाया जातो. मात्र हेच जर तुम्हाला घराच्या बाहेर पडण्या आधी माहिती मिळाली तर तुमचा वेळ वाचू  शकतो. इथून पुढे आता मुंबईकरांना रस्त्या वाहतुकीसाठी बंद असल्यास किंवा काम सुरू असल्यास त्यांची माहिती मिळणार आहे.

[embedded content]

संबंधित बातम्या

Mumbai Corona : मुंबईत कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत वाढ! लक्षणं असल्यास RT-PCR चाचणी करा, डॉक्टरांना BMCचे निर्देश

‘भाजप नाच्या पोरांसारखा बाईच्या इशाऱ्यावर नाचतो, हे आश्चर्यच!’ सामना अग्रलेखातून शिवसेनेचा हल्लाबोल

Lata Dinanath mangeshkar Award : जितेंद्र आव्हाड म्हणतात हा तर मराठी माणसांचा अपमान, मुख्यमंत्री, पवारांच्या नावावरून रोहित पवारांचाही मंगेशकरांना टोला

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/information-about-road-closures-now-available-on-google-maps-mumbai-municipal-corporations-initiative-will-save-the-time-of-citizens-694518.html