मुंबई बातम्या

पोस्टल लाईफ इन्शुरन्स मुंबई इथे बारावी पास उमेदवारांसाठी पदभरती – News18 लोकमत

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2021 असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै: पोस्टल लाईफ इन्शुरन्स (Postal Life Insurance Mumbai) मुंबई (Mumbai jobs) इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. बारावी पास (12th pass jobs) उमेदवारांसाठी एजन्ट  (Agent) या पदासाठी ही भरती होणार आहे. उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

एजन्ट  (Agent for Postal Life Insurance)

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

हे वाचा – ऑनलाईन जॉब शोधात असाल तर ‘या’ चुका कधीच करू नका; अन्यथा होईल प्रचंड नुकसान

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी 18 ते 50 वर्ष वयोमर्यादा असणार आहे.

या पत्त्यावर पाठवा अर्ज

वरिष्ठ अधीक्षक डाकघर, मुंबई पूर्व विभाग कार्यालय, तिसरा मजला, दादर पोस्ट ऑफिस इमारत, दादर पूर्व, मुंबई 400014.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

Published by:
Atharva Mahankal

First published:
July 11, 2021, 5:53 PM IST

Source: https://lokmat.news18.com/career/postal-life-insurance-mumbai-recruitment-2021-openings-for-agent-posts-mham-578043.html