मुंबई बातम्या

मुंबई महानगरपालिकेची सरस कामगिरी; 35 दिवसांत उभारलं 2170 बेड्सचं अत्याधुनिक हॉस्पिटल – TV9 Marathi

महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे.

मुंबई महापालिका

मुंबई : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे. येत्या काही दिवसात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी तिसऱ्या लाटेसाठी सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत केवळ 35 दिवसात 2170 बेडच्या कोव्हिड रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. (Mumbai Malad 2170 beds jumbo covid 19 hospital built in 35 days)

महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिकेकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहे.

केवळ 35 दिवसात कोरोना रुग्णालयाची निर्मिती

नुकतंच मुंबई महापालिकेने मालाड भागात केवळ 35 दिवसात कोरोना रुग्णालयाची निर्मिती केली आहे. हे कोव्हिड रुग्णालय जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारे बनवण्यात आले आहे. हे रुग्णालय अग्निरोधक आणि पर्यावरण अनुकूल आहे. या रुग्णालयात 70 टक्के बेड हे ऑक्सिजनयुक्त आहेत. तसेच 384 बेड हे आयसोलेशनसाठी ठेवण्यात आले आहेत.

या रुग्णालयात मुलांसाठी 42 आयसीयू बेड बसविण्यात आले आहेत. तर यासह 20 बेड डायलिसीससाठी आहेत. या रुग्णालयावर नजर ठेवण्यासाठी 240 सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई विकास प्राधिकरणाकडून हे रुग्णालय बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

मुंबईत 5 ठिकाणी नवे कोव्हिड सेंटर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबईची सज्जता पाहायला मिळत आहे. तर तिसऱ्या लाटेसाठी मुंबईत 7 हजार बेडची तयार करण्यात आले आहेत. मुंबईतील मालाड, महालक्ष्मी, सोमय्या ग्राऊंड, नेस्को सेंटर 2, कांजूरमार्ग या 5 ठिकाणी नवे कोव्हिड सेंटर उभारण्यात येणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी हे नवे कोरोना सेंटर उभारण्याचा काम सुरु आहे.

मुंबईत उभारण्यात येणारे नवे कोविड सेंटरचे 70 टक्के बेड ऑक्सिजनयुक्त असणार आहे. तर यात काही विशेष पेडियॉट्रीक वॉर्डही असणार आहे. मुंबईतील मालाड येथील कोविड सेंटर येत्या आठ दिवसांत सुरु केले जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी  यांनी दिली आहे

लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड

मुंबईतील मालाड कोविड सेंटरमध्ये 2170 बेड उपलब्ध आहेत. हे सेंटर तिसऱ्या लाटेसाठी पहिल्या टप्प्यात सुरु करण्यात येणार आहे. यात मालाड, महालक्ष्मी, सोमय्या ग्राऊंड, नेस्को सेंटर 2, कांजूरमार्ग या पाच ठिकाणांचा समावेश आहे. यात लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड उपलब्ध करण्यात आला आहे. यात एकूण 7000 बेड उपलब्ध होणार आहेत
मुलासोबत त्यांच्या पालकांना देखील राहण्यासाठी सुविधा उपलब्ध असणार आहे, असेही सुरेश काकाणी म्हणाले.

(Mumbai Malad 2170 beds jumbo covid 19 hospital built in 35 days)

संबंधित बातम्या : 

मुंबईकरांना दिलासा, आता कस्तुरबा रुग्णालयात ‘डेल्टा प्लस’ चाचणी होणार, अवघ्या दोन दिवसात मिळणार रिपोर्ट

मुंबईकरांसाठी गूड न्यूज, 50 टक्के लहान मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

Mumbai Corona | 5 नवे कोव्हिड सेंटर, 70 टक्के ऑक्सिजनयुक्त बेड, तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/mumbai-bmc-corona-third-wave-malad-2170-beds-jumbo-covid-19-hospital-built-in-35-days-485374.html