मुंबई बातम्या

Mumbai Pune expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी; खंडाळा घाट-पनवेलपर्यंत वाहनांच्या रांगा – Maharashtra Times

लोणावळा: नाताळची सुट्टी आणि त्याला जोडूनच शनिवार आणि रविवारची सलग सुट्टी आल्यानं मोठ्या संख्येनं लोक पर्यटन आणि गावी खासगी वाहनांनी निघाले आहेत. त्यामुळं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai Pune expressway) प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा घाटातील अमृतांजन पूल ते पनवेलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. (Traffic jam on Mumbai Pune expressway)

नाताळ आणि त्यानंतर शनिवार, रविवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic jam) झाली आहे. खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. खंडाळा घाटातील अमृतांजन पूल ते पनवेलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. एरवी या द्रुतगती महामार्गावर वाऱ्याच्या वेगाप्रमाणे वाहने धावत असतात. मात्र, आज चित्र वेगळे असून, या द्रुतगती महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे.



Source: https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/traffic-jam-on-mumbai-pune-expressway-near-khandala-and-khalapur/articleshow/79953238.cms