मुंबई बातम्या

आर्थिक वर्षात मुंबई पालिकेनं मालमत्ता कर वसुलीची लक्ष घटवले – Sakal

मुंबई: कोविडमुळे मुंबईची आर्थिक कोंडी झालेली असताना त्याचा फटका आता मुंबई महानगर पालिकेलाही बसू लागला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात महानगर पालिकेनं मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वसुलीचे ध्येयात दिड हजार कोटीहून अधिकची कपात केली आहे.

मालमत्ता करातून या आर्थिक वर्षात महानगर पालिकेनं 6 हजार 768 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे ध्येय ठेवले होते. मात्र कोविडमुळे हे ध्येय 4 हजार 500 ते 5 हजार कोटी रुपयांपर्यंत वसुल करण्यावर जोर देण्यात येणार आहे, अशी माहिती महानगर पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली. उर्वरीत कर वसुल करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र या आर्थिक वर्षात 4 हजार 500 ते 5 हजार कोटी रुपयांपर्यंतच्या वसुलीसाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

मालमत्ता कर वसुलीसाठी करदात्यांना पत्र पाठविण्यास सुरुवात झाली आहे, असे अतिरिक्त आयुक्त पी.वेलारसू यांनी सांगितले. जानेवारी नंतर प्रत्यक्ष कर वसुली जोरात सुरु होणार आहे. महानगर पालिकेच्या उत्पन्नातील 20 टक्‍क्‍याहून अधिक वाट मालमत्ता करातून येतो. यंदा घसरेल्या उत्पन्नाचा अंदाज लक्षात घेऊन महानगर पालिकेने विकास कामातील दिड हजार कोटी रुपयांना कात्री लावली आहे. तसेच कार्यालयीन खर्चातून 20 टक्के बचत करण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा-  बुधवार ठरला मुंबईतील आतापर्यंतचा सर्वात थंड दिवस, तापमान 15.8 अंशापर्यत घसरले

500 चौरस फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांना यांना मालमत्ता कर वगळता त्यात समाविष्ट असलेले इतर कर,उपकर आणि शुल्क भरावे लागणार आहे. “याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात आला आहे. त्यांनीही मालमत्ता कर वगळून इतर कर उपकर शुल्क वसुल करता येईल असे सांगितले आहे, असेही सांगण्यात आले.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईत 15 लाख घरेही 500 चौरस फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाची आहे. गेल्या वर्षी या घरांचा मालमत्ता करासह त्यात समाविष्ट असलेला सर्व उपकर आणि कर शुल्क रद्द झाल्याने पालिकेला 400 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले होते. यंदा प्रत्यक्ष मालमत्ता कराचा 30 टक्‍क्‍यांच्या आसपास हिस्सा कमी करुन वसुली करण्यात येणार असल्याने 280 कोटी रुपयां पर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्‍यता आहे.

——————-

(संपादन- पूजा विचारे)

Financial year bombay municipal corporation Property tax Decrease

Source: https://www.esakal.com/mumbai/financial-year-bombay-municipal-corporation-property-tax-decrease-389453