मुंबई बातम्या

IPL 2020 Final Live Score MI vs DC: या आयपीएलमधील सुपर स्ट्रायकर कोणता फलंदाज ठरला, पाहा… – Maharashtra Times

दुबई:IPL 2020 Final Live Score MI vs DC आयपीएल २०२०च्या विजेतेपदासाठी आज गतविजेते मुंबई इंडियन्स आणि प्रथमच फायनलमध्ये पोहोचलेले दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होत आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर ही लढत होणार आहे. या दोन्ही संघांनी स्पर्धेत अन्य संघांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. गुणतक्त्यात ते पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर होते. पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअर बोर्ड…

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स Live अपडेट (mumbai indians vs delhi capitals ipl 2020 final )
या आयपीएलमधील कोण ठरला व्हॅल्यूएबल खेळाडू, पाहा…
या आयपीएलमधील व्हॅल्यूएबल खेळाडू ठरला तो राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चर.

या आयपीएलमधील ऑरेंज कॅप कोणत्या फलंदाजाने पटकावली, पाहा…
या आयपीएलमधील ऑरेंज कॅप किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने पटकावली.

या आयपीएलमधील सुपर स्ट्रायकर कोणता फलंदाज ठरला, पाहा…

या आयपीएलमधील पर्पल कॅप कोणत्या गोलंदाजाने पटकावली, पाहा…
या आयपीएलमधील पर्पल कॅप दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने पटकावली.

या आयपीएलमधील फेअर प्ले पुरस्कार कोणी पटकावला, पाहा…
या आयपीएलमधील फेअर प्ले पुरस्कार मुंबई इंडियन्सच्या संघाने पटकावला.

या आयपीएलमधील सर्वाधिक षटकार कोणी फटकावले, पाहा…
या आयपीएलमधील सर्वाधिक ३० षटकार मुंबई इंडियन्सच्या इशान किशनने फटकावले.

या आयपीएलमधला एमर्जिंग प्लेअर कोण ठरला, पाहा…
या आयपीएलमधला एमर्जिंग प्लेअर ठरला तो आरसीबीचा युवा सलामीवीर देवदत्त पडीक्कल.

अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच कोण ठरला, पाहा…
अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार यावेळी मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला देण्यात आला. बोल्टने सुरुवातीला दिल्लीला जोरदार दोन धक्के दिले आणि सामन्यात एकूण तीन बळी मिळवले.

अंतिम सामन्यात गेम चेंजर कोण ठरला, पाहा…
आजच्या अंतिम सामन्याचा गेम चेंजर ठरला तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा.

मुंबई इंडियन्सची विक्रमी पाचव्या जेतेपदाला गवसणी

मुंबईला मोठा धक्का, किरॉन पोलार्ड आऊट

रोहित शर्मा आऊट, मुंबईला मोठा धक्का

रोहित शर्माचे धडाकेबाज अर्धशतक

मुंबईला मोठा धक्का, सूर्यकुमार यादव आऊट

मुंबईची धडाकेबाज सुरुवात, १० षटकांत १ बाद ८८

चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मुंबईला पहिला धक्का

मुंबईने रबाडाच्या पहिल्याच षटकात केली धुलाई
मुंबईच्या संघाने दिल्लीचा अव्वल गोलंदाज कागिसो रबाडाच्या पहिल्याच षटकात जोरदार फटकेबाजी केली. मुंबईने या षटकात तीन चौकार आणि एका षटकारासह १८ धावा वसूल केल्या.

रोहित शर्माने षटकारासह केली मुंबईच्या डावाची सुरुवात

अय्यर-पंत यांची दमदार अर्धशतके, दिल्लीचे मुंबईपुढे १५७ धावांचे आव्हान
श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मुंबई इंडियन्सपुढे १५७ धावांचे आव्हान ठेवता आले होते.

दिल्लीचा सहावा धक्का, अक्षर पटेल आऊट

दिल्लीचा अर्धा संघ गारद, शिमरॉन हेटमायर आऊट
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरचे दमदार अर्धशतक
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने यावेळी दमदार अर्धशतक साकारत संघाचा डाव सावरल्याचे पाहायला मिळाले. श्रेयसने यावेळी ४० चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले, त्याचे हे या स्पर्धएतील तिसरे अर्धशतक ठरले.

मुंबईचा दिल्लीला मोठा धक्का, अर्धशतकवीर रिषभ पंत आऊट

रिषभ पंतने साकारले धडाकेबाज अर्धशतक
रिषभ पंतने यावेळी चौकार लगावत आपले अर्धशतक साकारले. पंतने यावेळी ३५ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.

दिल्लीने डाव सावरला, १३ षटकांत ३ बाद ९९ धावा

मुंबईच्या इशान किशनने दुखापतीमुळे मैदान सोडले
मुंबई इंडियन्सच्या इशान किशनला सहाव्या षटकात दुखापत झाली. सहाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर इशानने दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरचा झेल सोडला. त्यावेळी इशानला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले.

मुंबईचा दिल्लीला मोठा धक्का, शिखर धवन आऊट

मुंबईचा दिल्लीला मोठा धक्का, अजिंक्य रहाणे

मुंबईने पहिल्याच चेंडूवर दिला दिल्लीला धक्का

पाहा दोन्ही संघांतील बदल

फायनलचा टॉस दिल्लीने जिंकला, प्रथम फलंदाजी करणार

>> दिल्लीने १६ पैकी ९ लढतीत विजय मिळवला आहे.

>> मुंबई संघाने १५ पैकी १० लढती जिंकल्या आहेत

>> या हंगामात मुंबई आणि दिल्ली यांच्यात ३ लढती झाल्या आहेत. या सर्व लढती मुंबईने एकतर्फी जिंकल्या आहेत.

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/mumbai-indians-vs-delhi-capitals-ipl-2020-final-live-cricket-score-updates-from-dubai-international-cricket-stadium/articleshow/79148828.cms