मुंबई बातम्या

काळा पैसा झाला नोटाबंदीमुळे सफेद – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

पत्नीला दबावाखाली ठेवून वेगवेगळ्या मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याच्या आरोपाखाली मागील नऊ महिन्यांपासून अटकेत असलेल्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाकडून नुकताच जामीन मिळाला. ‘तक्रारदार महिला पहिल्या घटनेनंतर पतीचा हेतू माहीत असूनही त्याच्या अन्य मित्रांसोबत गेली. शिवाय एका मित्राच्या पत्नीचा फोन नंबरही घेतला, हे अनैसर्गिक व विचित्र आहे. शिवाय पतीला सोडून गेल्यानंतरही बलात्काराविषयीचा एफआयआर खूप विलंबाने नोंदवला. त्यामुळे प्रथमदर्शनी घडलेल्या घटना संमतीने होत्या, असे दिसते’, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने आरोपी जिग्नेश डंगरवाला याला सशर्त जामीन दिला.

‘आरोपीने कनिष्ठ न्यायालयातील खटल्याच्या सुनावणीत सर्व तारखांना न्यायालयात उपस्थित रहावे आणि तक्रारदार पत्नीवर दबाव आणू नये, अशा अटी घालून न्या. सारंग कोतवाल यांनी २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जिग्नेशला जामीन मंजूर केला.

‘मे-२०१७मध्ये सासूचे निधन झाल्यानंतर पतीने वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली आणि मित्रांसोबत शय्यासोबत करण्यास भाग पाडले’, असा आरोप दोन मुलांची आई असलेल्या तक्रारदार पत्नीने एफआयआरमध्ये केला आहे. ‘१५ जून २०१७ रोजी रात्री फेरफटका मारण्याच्या बहाण्याने पतीने घराबाहेर नेले. त्यावेळी अचानक एक कार आली. त्यात कार चालवणारा राजीव हा तिच्या पत्नीसोबत होता. पती मागच्या सीटवर बसला आणि मलाही सोबत बसण्यास सांगितले. नंतर मला मालाडमध्ये एका अज्ञात ठिकाणच्या फ्लॅटवर नेण्यात आले. तिथे राजीवने बळजबरी करून माझ्यावर बलात्कार केला. त्यावेळी पती खोलीबाहेरच थांबला होता. मी खोलीबाहेर आल्यानंतर घडलेली घटना सांगितली असता पतीने याविषयी कोणालाही न सांगण्यास बजावले आणि पुन्हा असे होणार नसल्याची हमी दिली. मात्र, त्यानंतर बोरिवलीमध्ये ऑक्टोबर-२०१८मध्ये आणि दहिसरमध्ये फेब्रुवारी-२०१९मध्ये असेच प्रकार होऊन पतीने रवी व तुषार यांच्याशी शय्यासोबत करण्यास भाग पाडले. याविषयी सासऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत माझ्याविषयी अपशब्द वापरले. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने मी मुलांना सासरीच ठेवून माझ्या वृद्ध आईकडे गेले. मुलुंडमधील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अखेर ७ डिसेंबर २०१९ रोजी मी पोलिसांत तक्रार दिली’, असे एफआयआरमध्ये नमूद आहे.

‘तक्रारदार महिलेने आधी कधीही तक्रार नोंदवली नाही. रुग्णालयातही कोणाकडे तक्रार मांडली नाही. घडलेले प्रकार संमतीने होते. त्यामुळे आरोपीविरोधात बलात्काराचा किंवा त्यात आरोपींना मदत केल्याचा गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही. शिवाय दोन मुख्य आरोपींना पूर्वीच जामीन मिळाला आहे. पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपपत्रही दाखल केलेले आहे’, असा युक्तिवाद जिग्नेशतर्फे अॅड. मिलन देसाई यांनी मांडला. तर ‘तक्रारदार दबावाखाली होती आणि डिसलेक्सिया आजाराने ग्रस्त असल्याने संमती देण्याची क्षमता तिच्यात नव्हती’, असा युक्तिवाद तिच्या वकिलांनी केला. मात्र, न्यायमूर्तींनी तो ग्राह्य धरला नाही.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bombay-high-court-granted-conditional-bail-to-accused-jignesh-dangarwala-after-nine-months/articleshow/78451703.cms