मुंबई बातम्या

१७ मे पर्यंत मुंबईत रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी – Loksatta

१७ मेपर्यंत म्हणजेच लॉकडाउन असेपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत मुंबईत संचारबंदी असणार आहे. मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त वैद्यकीय सेवांना म्हणजेच क्लिनिक्स, हॉस्पिटल्स आणि मेडिकल्स यांना या वेळेतून मुभा देण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय कारणाशिवाय कुणीही बाहेर पडू नये असेही सांगण्यात आले आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी या संदर्भातले एक पत्रकच जाहीर केले आहे. त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे १७ मेपर्यंत मुंबईत रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी असणार आहे.

महाराष्ट्र Epidemec diseases Act 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ यानुसार हे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई शहराचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसारच हा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे कारण मुंबईत करोना व्हायरसचे ७ हजारच्या वर रुग्ण आहेत. त्याचमुळे मुंबईत रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १७ मेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे असंही या पत्रात म्हटलं आहे.

सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत लॉकडाउनचे नियम पाळून आवश्यकता असल्यास बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. लॉकडाउनचा कालावधी केंद्र सरकारने १७ मे पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे १७ मे पर्यंत मुंबईत रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी असणार आहे. मुंबईकरांनी गरज असेल तरच बाहेर पडावं आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणजेच किमान सहा फुटांचं अंतर पाळूनच व्यवहार करावेत असंही या पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on May 4, 2020 4:27 pm

Web Title: curfew in mumbai till 17th may from 8 pm to 7am says police commissioner scj 81

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/curfew-in-mumbai-till-17th-may-from-8-pm-to-7am-says-police-commissioner-scj-81-2149590/