मुंबई बातम्या

व्हायरल होत असलेल्या मॅसेजवर मुंबई पोलिसांचं उत्तर, तर जनतेसाठी ‘खास’ राशीभविष्य – Times Now Marathi

व्हायरल होत असलेल्या मॅसेजवर मुंबई पोलिसांचं उत्तर, तर जनतेसाठी ‘खास’ राशीभविष्य&  | & फोटो सौजन्य:&nbspTwitter

थोडं पण कामाचं

  • सोशल मीडियांवरील अफवांवर मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण
  • जनतेला घरात राहण्यासाठी सांगितलं राशीभविष्य
  • अफवांवर विश्वास न ठेवता योग्य माहिती जाणून घ्या

मुंबई: राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या १००च्या वर पोहोचली आहे. केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीही कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलीय. मात्र तरीही सोशल मीडियाद्वारे पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवत जनता मोठ्या संख्येनं सकाळी भाजी मार्केटमध्ये दाखल होत असल्याचं चित्र आपण बघतोय. सोशल मीडियावर सध्या एक मॅसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. या मॅसेजमध्ये सकाळी पेपर या वेळेत आणि भाजी, दूध आणण्यासाठी एक वेळ निश्चित केलीय, असं सांगितलंय. मात्र हा मॅसेज म्हणजे अफवा असल्याचं स्पष्टीकरण मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुद्धा मुंबई पोलिसांचं हे ट्विट रिट्विट करत अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन जनतेला केलंय.

तर दुसरीकडे सोशल मीडियावर जनतेनं घरातच राहावं यासाठी सतत आवाहन केलं जातंय. त्यासाठी विविध मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक मॅसेज मुंबई पोलिसांनी सुद्धा ट्विटरवर पोस्ट केलाय. हा मॅसेज आहे नागरिकांचं राशीभविष्य सांगणारा. यानुसार प्रत्येक राशीच्या व्यक्तींना घरात राहण्याचं आवाहन केलंय. तरच आपलं भविष्य चांगलं राहिल, हे सूचवण्यात आलंय.

या मॅसेज सारखेच अनेक मॅसेज सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. लोकं एकमेकांना घरात राहण्यासाठी प्रोत्साहन देतांना दिसत आहेत. पाहा त्यातीलच काही मॅसेज…

एका मॅसेजमध्ये तुम्हाला सुपरहिरो घरात बसून दिसतोय. त्याला विचारण्यात येतंय की, कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी तू काहीच का नाही करत, तर त्यानं मी प्रयत्न करतोय, हे उत्तर देत असतांना सुपरहिरो घरात असल्याचं दिसतंय. कारण घरात राहणं हाच एक उपाय कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी दिसतोय.

बातमीची भावकी

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/mumbai-police-told-about-rumours-on-social-media/286121