मुंबई बातम्या

सर्वसामान्यांकडून नियमित करवसुली, मात्र श्रीमंतांवर मुंबई महापालिका मेहेरबान! – TV9 Marathi

मुंबई महापालिका एकीकडे सर्वसामान्य नागरिकांकडून सर्व कर वसूल करते तर दुसरीकडे मात्र श्रीमंतांना झुकत माप देत असल्याचे समोर आलं आहे.

मुंबई : मुंबई महापालिका एकीकडे सर्वसामान्य नागरिकांकडून सर्व कर वसूल करते तर दुसरीकडे मात्र श्रीमंतांना झुकतं माप देत असल्याचे समोर आलं आहे. मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर थकवणाऱ्या 50 टॉप थकबाकीदारांची यादी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे. (Every month collection of tax from common people but Mumbai Municipal Corporation partiality richest people)

मुंबई महापालिकेला सर्वात मोठा महसूल जकात करामधून मिळत होता. जकात कर रद्द झाल्यावर पालिकेला मालमत्ता करातून सर्वात जास्त महसूल अपेक्षित आहे. मात्र मालमत्ता कराची तब्बल 15 हजार कोटींची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. त्यातील टॉप 50 थकबाकीदारांकडे तब्बल 1683 कोटी रूपयांची थकबाकी आहे.

त्यात विविध प्राधिकरण, संस्था, शासकीय तसेच निमशासकीय संस्था आणि विकासक व गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे. तसेच महापालिकेच्या 24 विभागातही टॉप 50 थकबाकीदारांची यादी काढण्यात आली आहे. त्यात एकूण 4450.79 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. मुंबई महापालिकेची बड्या लोकांकडे शहर विभागात 1506 कोटी, पूर्व उपनगरात 686 कोटी तर पश्चिम उपनगरात 2257 कोटी रुपये थकाबकी आहे.

मोठे थकबाकीदार

एच पूर्व विभाग – फॉर्च्युन 2000 इमारती 164 कोटी
ए विभागातील – ईश्वसय्या रिसर्च व डेव्हलपमेंट सेंटर 141 कोटी
म्हाडा मुंबई गोरेगाव रिजन 4 – 75 कोटी
एचडीआयएल – 55 कोटी
सेव्हन हिल रुग्णालय – 51 कोटी
एमएमआरडीए – 49 कोटी
सुमेर असोसिएसट – 37 कोटी
जवाला रियल इस्टेस्ट – 47 कोटी
रूणवाल प्रोजेक्ट्स – 29 कोटी
शिवकृपा – 35 कोटी
रघुवंशी मिल – 24 कोटी
म्हाडा : सुमारे 150 कोटी रुपये
एसआरए : 23 कोटी
हॉटेल ताज लँड एन्ड वांद्रे : 35 कोटी रुपये
बिच रिसॉर्ट : 22 कोटी रुपये
बॉम्बे क्रिकेट असोशिएशन : 34 कोटी रुपये
वरळी वल्लभभाई स्टेडियम : 28 कोटी रुपये
मुंबई विमानतळ : 25 कोटी रुपये

पालिकेला महसूल मिळत नसताना मालमत्ता कराची तब्बल 15 हजार कोटींची थकबाकी विविध प्राधिकरण, संस्था, शासकीय तसेच निमशासकीय संस्था आणि विकासक व गृहनिर्माण संस्थांकडे थकीत आहे. त्यापैकी टॉप ५० थकबाकीदारांकडे 1683 कोटी रुपयांची थकबाकी आहे. पालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी ही थकबाकी प्रशासनाने त्वरित वसूल करावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर हा एकमेव उत्पन्न साधन आहे. सर्व 24 वॉर्ड मधील सर्व अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत लवकर हा महसूल गोळा करण्यात यावा, असे आदेश विधी समिती अध्यक्षांनी दिलेत.

(Every month collection of tax from common people but Mumbai Municipal Corporation partiality richest people)

हे ही वाचा

Bhandara Fire News LIVE | निष्काळजीपणा झाला असेल तर शिक्षा झालीच पाहिजे : राजेश टोपे

“युतीत होतो म्हणून शिवसेनेची महापालिका, यंदा मात्र सगळीकडे भाजपचाच महापौर”

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/every-month-collection-of-tax-from-common-people-but-mumbai-municipal-corporation-partiality-richest-people-366700.html