मुंबई बातम्या

MRVC Recruitment: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज – Maharashtra Times

MRVC Recruitment: मुंबई रेल्वे अंतर्गत चांगले पद आणि पगाराची नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

मुंबई रेल्वे अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक आणि एसएससी (मुख्यालय) ची पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

मुंबई रेल्वे कॉर्पोरेशन अंतर्गत असिस्टंट मॅनेजर आणि एसएसई (मुख्यालय) च्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरण्यात येणार आहेत. ही भरती एक वर्षासाठी असणार आहे. उमेदवारांचे काम पाहून हा कालावधी वाढविला जाऊ शकतो. भारतीय रेल्वेतील निवृत्त उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ६४ वर्षांच्या आत असावे.

BMC Recruitment: परप्रांतीय अर्ज करण्यापुर्वी तुम्हीच मिळवा नोकरी, दीड लाखांपर्यंत मिळेल पगार
उमेदवारांना मुंबई येथे नोकरी करावी लागणार आहे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

३ ऑक्टोबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज अधिकृत वेबसाइटवरुन पाठवायचे आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

IRCTC Recruitment 2022: दहावी उत्तीर्णांना कॉम्प्युटर ऑपरेटर पदाची नोकरी, ‘येथे’ पाठवा अर्ज
मुंबई उच्च न्यायालयात डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांची भरती, ३१ हजारपर्यंत मिळेल पगार

Source: https://maharashtratimes.com/career/career-news/mrvc-recruitment-assistant-manager-post-vacant-in-mumbai-railway-development-corporation/articleshow/94474459.cms