मुंबई बातम्या

मुंबईत भरणार कोकण मेळा – Sakal

मुंबईत भरणार कोकण मेळा

मुंबई
sakal_logo

By

घाटकोपर, ता. ३१ (बातमीदार) ः बशीर एम हजवानी फाऊंडेशन आणि कोकणी कम्युनिटी फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील साबू सिद्दीकी पॉलिटेक्निक कॉलेज ग्राऊंड या ठिकाणी ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान ‘कोकण मेळा’ पार पडणार आहे. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे या मेळाव्यात कोकणातील खाद्य संस्कृती तसेच लोककलेचे दर्शन या मेळाव्‍यात होणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा विविध ठिकाणाहून कोकणी माणूस या मेळाव्‍यात येणार आहे. विशेषतः या मेळाव्‍यात भव्य जॉब फेअरचे आयोजन केले असून यात विविध कंपन्या सहभागी होणार आहेत. सोबतच विवाह इच्छुक वधू-वरांची नोंदणी तसेच आर्थिक दुर्बल घटकांचे विवाह या ‘कोकण मेळा’मार्फत लावून दिले जाणार आहे. कोकणी माणसाला वैद्यकीय क्षेत्रात आणि न्यायिक क्षेत्रात मदत मिळावी, याकरिता डॉक्टर मिट आणि लॉयर मिटचे आयोजन करण्यात येणार आहे. कोकणी माणसाला व्यवसायात संधी उपलब्ध व्हावी, याकरिता सुप्रसिद्ध व्यावसायिक मार्गदर्शन करणार आहेत. बशीर एम. हजवानी फाऊंडेशन ही संस्था दुबईतील व्यवसायिक बशीर हजवानी यांची आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiZGh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vbXVtYmFpL3RvZGF5cy1sYXRlc3QtbWFyYXRoaS1uZXdzLW11bTIzaDE1MDE4LXR4dC1tdW1iYWktdG9kYXktMjAyMzAxMzExMjAwMDDSAWhodHRwczovL3d3dy5lc2FrYWwuY29tL2FtcC9tdW1iYWkvdG9kYXlzLWxhdGVzdC1tYXJhdGhpLW5ld3MtbXVtMjNoMTUwMTgtdHh0LW11bWJhaS10b2RheS0yMDIzMDEzMTEyMDAwMA?oc=5