मुंबई बातम्या

नवी मुंबई : आगीपासून सर्वांना वाचवले आणि स्वतः दुर्दैवाने आगीच्या भक्षस्थानी – Loksatta

ऐरोलीत पेपर कंपनीला लागलेल्या आगीत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू

नवी मुंबई : शनिवारी ऐरोली येथील एका पेपर कंपनीला आग लागली होती. आग लागल्याचे सर्वात अगोदर किचन मध्ये काम करणाऱ्या महिलेक्षा लक्षात आले. तिने तत्काळ आरडा ओरडा करीत सर्वांना बाहेर काढले आणि दुर्दैवाने कंपनीच्या पहिल्या माळ्यावरील किचन मध्ये चहाचे आधण ठेवल्याचे तिच्या लक्षात आले. ते बंद करण्यास ती पुन्हा गेली आणि आगीच्या भक्षस्थानी पडली.

दिशा इंटरप्राईजेस नावाची एक कंपनी ऐरोली सेक्टर एक भूखंड क्रमाक ५६ येथे आहे. शनिवारी दुपारी या कंपनीत आग लागली. आग लागल्यावर येथे काम करणाऱ्या उर्मिला सखाराम नाईक या अंदाजे चाळीस वर्षीय महिलेच्या लक्षात आले. ती किचन मधून तत्काळ बाहेर पडून आगीची माहिती देत सर्वांना बाहेर काढले व स्वतःही बाहेर पडली. मात्र पहिल्या माळ्यावर असलेल्या किचन मध्ये चहाचे आधण ठेवल्याचे तिच्या लक्षात आले. तो पर्यत फार मोठी आग नसल्याने आपण गँस बंद करून येऊ शकतो असे तिला वाटले. मात्र तिचा अंदाजा चुकला आणि ती वर जागाच त्या ठिकाणी आग भडकली त्यात तिचा भाजून दुर्दैवी मृत्यू झाला.

आग दुपारी साडेतीनच्या सुमारास लागली, तिच्यावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यास अकरा वाजले आणि त्या नंतर कुलिंगचे काम करीत असताना कामगारांनी सांगितल्या प्रमाणे उर्मिला यांचा मृतदेहाच शोधही सुरु होता. त्यावेळी तिचा पूर्ण जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. अशी माहिती अग्निशमन मुख्याधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी दिली. तसेच इतर तपासणीही सुरु आहेत अहवाल तयार होताच त्या अनुशंघाने योग्य ती कारवाई केली जाईल असेही जाधव यांनी माहिती दिली. तर या प्रकरणी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसून सदर महिलेचा अपघाती अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.डी. ढाकणे यांनी दिली.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMieWh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9uYXZpbXVtYmFpL3VuZm9ydHVuYXRlLWRlYXRoLXdvbWFuLWZpcmUtYXQtYS1wYXBlci1jb21wYW55LWluLWFpcm9saS1uYXZpLW11bWJhaS15c2gtOTUtMzM4NTM1OC_SAX5odHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbmF2aW11bWJhaS91bmZvcnR1bmF0ZS1kZWF0aC13b21hbi1maXJlLWF0LWEtcGFwZXItY29tcGFueS1pbi1haXJvbGktbmF2aS1tdW1iYWkteXNoLTk1LTMzODUzNTgvbGl0ZS8?oc=5