मुंबई बातम्या

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज मुंबईत रोड शो – Maharashtra Times

मुंबई : उत्तर प्रदेशला (यूपी) एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आणि विदेशी गुंतवणूकदारांना ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट (जीआयएस २०२३) मध्ये आमंत्रित करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आणि त्यांच्या मंत्रीमंडळाने यूपीमध्ये मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून योगी आदित्यनाथ बुधवारी मुंबईत आले होते.

योगी आदित्यनाथ आज, गुरुवारपासून (५ जानेवारी) मुंबईतून रोड शोची सुरुवात करतील. नोएडा येथे आगामी फिल्म सिटीच्या संदर्भात देशातील आघाडीचे उद्योजक आणि बँकर्स तसेच प्रमुख चित्रपट व्यक्तींचीही ते भेट घेतील. संभाव्य गुंतवणूकदारांना उपलब्ध संधी आणि उत्तर प्रदेशातील अनुकूल व्यावसायिक वातावरणाची ओळख करून देण्यासाठी देशातील नऊ शहरांमध्ये रोड शो आयोजित केले जाणार आहेत.

मुंबईतील रोड शोपूर्वी ते आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, पिरामल एंटरप्राइझ लि.चे अध्यक्ष अजय पिरामल, जेएसडब्ल्यू ग्रुपचे एमडी सज्जन जिंदाल, टोरेंट पॉवरचे एमडी जिनल मेहता आणि हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांची योगी आदित्यनाथ भेट घेतील. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन, पार्ले अॅग्रोचे चेअरमन प्रकाश चौहान आणि एमडी शवना चौहान, अदानी पोर्ट्स लि.चे करण अदानी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सीईओ मुकेश अंबानी आणि गोदरेज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज यांच्याशीही ते चर्चा करतील.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMihwFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL2NoaWVmLW1pbmlzdGVyLXlvZ2ktYWRpdHlhbmF0aHMtcm9hZC1zaG93LWluLW11bWJhaS10b2RheS9hcnRpY2xlc2hvdy85Njc1MDc0Ny5jbXPSAYsBaHR0cHM6Ly9tYWhhcmFzaHRyYXRpbWVzLmNvbS9tYWhhcmFzaHRyYS9tdW1iYWktbmV3cy9jaGllZi1taW5pc3Rlci15b2dpLWFkaXR5YW5hdGhzLXJvYWQtc2hvdy1pbi1tdW1iYWktdG9kYXkvYW1wX2FydGljbGVzaG93Lzk2NzUwNzQ3LmNtcw?oc=5