मुंबई बातम्या

मुंबई पोलिसांचे आदेश, 10 ऑगस्टपर्यंत ‘या’ वस्तूंच्या वापरावर बंदी – News18 लोकमत

मुंबई, 22, जुलै : राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील, असे घटकांवर बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यामध्ये एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाईट, एअर क्राफ्ट, ड्रोन यांच्या वापरावर बंदी आणण्यात आली आहे. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 10 ऑगस्ट 2022 पर्यंत हे आदेश लागू करण्यात आले असल्याचे पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी सांगितले आहे.

आदेशाच्या पालन न केल्यास …

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाही, अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होवू नये याकरीता हे आदेश लागू आहेत.

यांसाठी हा नियम नाही – 

दरम्यान, पोलिसांनी हा आदेश लागू केला असला तर ज्यांनी या कालावधीत पूर्व लेखी परवानगी घेतली आहे, त्या लोकांसाठी हा आदेश शिथिल असेल, असेही या परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा – सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण वैध ठरवल्यानंतर निवडणूक आयोगाचे 13 महापालिकांना महत्त्वाचे आदेश

यावर बंदी –

यामुळे एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाईट, एअर क्राफ्ट, ड्रोन यांच्या वापरावर बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 10 ऑगस्ट 2022 पर्यंत बंदीचे आणण्यात आली आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

मुंबई

मुंबई

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai-police-banned-on-these-things-till-10th-august-know-details-mhkd-736074.html